आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:​​​​​​​किशोरवयीन मुलांना मोकळेपणाने बोलू द्या, त्यांना एखाद्या कामात गुंतवून ठेवा, यामुळे ती मानसिकरीत्या वेगाने सावरतील

न्यूयॉर्क16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुलांच्या निर्णयात त्यांना साथ द्या, त्यांना कमी लेखू नका

ओहायोच्या हायलँड हाइट्समध्ये १५ वर्षांच्या कॉलिन मूनीने घराच्या मागील व्हरांड्यात वर्गमित्रांसोबत खूप दिवसांनी गप्पा मारल्या. वर्षभर शाळेपासून लांब राहिलेल्या आठवीतील या सवंगड्यांनी फील्ड डे, ग्रॅज्युएशन डे व स्पेशल मासवर चर्चा केली. यामुळे त्यांचे मन काहीसे हलके झाले. जगभरात किशोरवयीन मुले कधीच इतकी म्लान दिसली नव्हती. ऑनलाइन क्लास, परीक्षा रद्द होवो वा मित्रांशी कट्टी फू... ही मुले निराशा व डिप्रेशनमध्ये आहेत. तज्ज्ञांनुसार, आता रुग्ण कमी होत चालले आहेत. यामुळे आगामी काळ त्यांच्यासाठी रिकव्हरीचा टप्पा असेल.

मानसोपचारतज्ज्ञ लीसा डेमोरनुसार, मानसिक बळ देणाऱ्या गोष्टींची निर्मिती ही शारीरिक स्नायूंच्या विकासासारखी असते. यामुळे मुलांसाठी वेळ द्यावा लागेल. त्यांच्यासाठी महामारी ही खूप मोठ्या नुकसानीसारखी आहे. ती मुक्तपणे खेळणेबागडणे, आजी-आजोबांसोबत सुट्टी घालवणे व बर्थडे पार्ट्यांना खूप मिस करतात. काहींचे मित्र दुरावले, तर काहींनी आपल्या आप्तांना गमावले आहे.

ब्रुकलिनची १५ वर्षीय एरियल आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी कविता करते. हा नैराश्यातून बाहेर पडण्याचा मार्ग असल्याचे ती सांगते. १७ वर्षांची इव्हा वेस्टरगार्ड म्हणाली, माझ्यासाठी नव्या लोकांशी जुळणे हाच जॉब आहे. भले पगार कमी का मिळेना. मनोविश्लेषकांनुसार, आगामी काळातही ही रुखरुख त्यांच्या आयुष्याचा भाग असेल. त्यांना पुढे जाण्यासाठी प्रेरित करा. म्हणजे वास्तवाचा ती आनंदाने स्वीकार करतील. त्यांना त्यांचे मत मोकळेपणाने आणि सविस्तर मांडू द्या. त्यांना एखाद्या कामात गुंतवून घेण्यास सांगा. जेणेकरून ते बाहेरील जगाशी स्वत:ला पुन्हा जोडू शकतील.

मुलांच्या निर्णयात त्यांना साथ द्या, त्यांना कमी लेखू नका
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, पुढील काळ कसा घालवायचा आहे, हे मुलांना ठरवू द्या. आपल्या इच्छा त्यांच्यावर लादू नका. त्यांना नवीन भाषा शिकायची असेल वा कादंबरी लिहायची असेल तर त्यांच्या मध्ये येऊ नका. त्यांना राहिलेला अभ्यास भरून काढायचा असेल तर त्यांची मदत करा. याबाबत त्यांच्यात अपराधीपणाची भावना असेल तर त्यातून बाहेर येण्यासाठी त्यांना मदत करा. इव्हास्टनचा १४ वर्षांचा कॉरी रॉबिन्सन कोरोनाग्रस्त झाला होता. तो म्हणाला, आता सुट्ट्यांत काही केले नाही तर स्वत:ला दोषी समजेल. तज्ज्ञ म्हणतात, असा विचार करणे चुकीचे अाहे. मुलांच्या मनात अपराधीत्वाची भावना असेल तर त्यांना पुढे जाता येणार नाहीत. त्यांच्या निर्णयात त्यांना साथ द्या, त्यांना कमी लेखू नका.

बातम्या आणखी आहेत...