आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिकन नेत्या नॅन्सी पॅलाेसी यांच्या महिनाखेरीस हाेणाऱ्या तैवान दाैऱ्यावरून भडकलेला चीन हल्ल्यासाठी टपून बसला आहे. पॅलोसी तैवानला गेल्यास त्यांचे विमान उडवून दिले जाईल, अशी धमकी चीनने दिली आहे. चीनच्या या वर्तनामुळे तैवानने बचावात्मक भूमिका घेताना हान कुआंग नावाचा वाॅरगेम सुरू केला. राजधानी तैईपेजवळील तामसुई नदीत सुरू असलेल्या वाॅर गेममध्ये तैवानने लढाऊ विमाने, रणगाडे, नाैदल जहाज व पायदळ सैन्यालादेखील सहभागी करून घेतले आहे. रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्यापासूनच चीनच्या तैवानवरील हल्ल्याची शक्यता वर्तवली जात आहे. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी गेल्या महिन्यात एक वक्तव्य केले. तैवानवरील ताब्यासाठी चीन लष्करी कारवाईबाबत मागेपुढे पाहणार नाही. पॅलाेसी यांनी तैवानचा दाैरा केल्यास अमेरिका युद्धाचे कारण ठरेल. तैवानला त्याचा परिणाम भाेगावा लागू शकताे.
- चीन हल्ला का करू इच्छिते?
चीन १९४९ पासून तैवानला आपला भाग मानते. तैवान मात्र स्वत:ची आेळख स्वतंत्र देश अशी देते. तैवानची लाेकशाहीवादी सरकार चीनच्या धाेरणाला विराेध करणारे आहे.
-तैवान चीनसाठी कशाप्रकारे आव्हानात्मक आहे?
चीनपासून केवळ १५० किमीवरील तैवान कट्टर अमेरिका समर्थक आहे. तैवानमध्ये अमेरिकेचे सैन्य तैनात आहे. त्यामुळे प्रशांत महासागरात चीनच्या तुलनेत अमेरिकेचा प्रभाव वाढलेला आहे.
-अमेरिका तैवानला मदत करेल?
आैपचारिकदृष्ट्या अमेरिका चीनला मान्यता देते तर अनाैपचारिक पातळीवर तैवानला पाठिंबा देते. हल्ल्याच्या काळात अमेरिका युद्धात सहभागी हाेणार नाही. पण तैवानला पाठिंबा देत राहणार आहे.
- जगावर काय परिणाम हाेईल?
जगातील ९२ टक्के सेमीकंडक्टर चिप तैवानमध्ये तयार हाेतात. युद्धामुळे माेबाइल, लॅपटाॅप, ऑटाेमाेबाइल, आराेग्य क्षेत्र, शस्त्रास्त्रे इत्यादी उत्पादनाला फटका बसू शकताे.
-अमेरिकेचे हितसंबंध काय?
चीनने तैवानवर ताबा मिळवल्यावर चीनच्या हाती जगातील सर्वात उन्नत असे चिप उद्याेग क्षेत्र येईल. त्याचा थेट परिणाम अमेरिकेवरही दिसेल. अनेक दशकांपासून तैवानमध्ये अमेरिकेची शस्त्रे आयात होते.
-तैवानची पाठराखण कोण करतील?
अमेरिकेसह ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, फ्रान्स, जपान तैवानला पाठिंबा देऊ शकतात. रशिया,दक्षिण काेरिया चीनचे समर्थन करतील.
भास्कर एक्स्पर्ट
-चीन हल्ला करू शकताे?
काॅस्ट बेनिफिट थिअरीनुसार माेठा हल्ला करणे चीन टाळेल. परंतु हल्ल्याची धमकी देत राहील. हाँगकाँग, मकाऊ प्रमाणे चीन उशिरा का हाेईना तैवानला देखील आपल्यात सामावून घेईल.
-जिनपिंगच्या दावेदारीशी संबंध?
जिनपिंग यांच्या परराष्ट्र धाेरणात शक्तिप्रदर्शन हा मुख्य अजेंडा आहे. परंतु तूर्त ते तैवानचा मुद्दा मांडणार नाहीत. नाेव्हेंबरच्या निवडणुकीपूर्वी पश्चिमेकडील देश ते मांडू शकतात.
-भारताची भूमिका काय राहील?
हल्ल्याचे स्वरूप सध्या गृहितकांवर आहे. भारत स्पष्टपणे भूमिका मांडणार नाही. चीनने वन इंडियाला पाठिंबा दिला पाहिजे. आपल्यालाही त्यांचे म्हणणे एेकावे लागेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.