आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इन्फॉर्मेशन टू इनसाइट:अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीत भारतीय का ठरतात निर्णायक...जाणून घेऊ

न्यूयॉर्कहून भास्करसाठी मोहम्मद अलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सहा राज्यांतील भारतीय लोक किंग मेकर, अमेरिकी निवडणुकीत भारतीय समुदायाचे महत्त्व काय?

अमेरिकेत भारतीय वंशाच्या लाेकांनी एक रात्रीत बायडेन यांच्यासाठी २४ काेटी रुपये उभारल्यामुळे सर्वच चकित झाले. परंतु मतांमध्ये १ टक्के एवढी भागीदारी असली तरी भारतीय लाेकांचा अमेरिकन निवडणुकीत अनेक पातळ्यांवर सहभाग असताे. निकालाची खात्री नसलेल्या राज्यांत तर भारतीय तसेच इतर स्थलांतरितांचे महत्त्व वाढले आहे. टेक्सासमध्ये रिपब्लिकनचा दबदबा राहिला आहे. परंतु यंदा पहिल्यांदाच अध्यक्षीय निवडणुकीत डेमाेक्रॅट उमेदवार बायडेन यांना ट्रम्प यांच्या तुलनेत तीन गुण जास्त मिळाले आहेत. डेलास माॅर्निंग न्यूज व युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सासच्या ताज्या पाहणीत बायडेन यांना ४८ व ट्रम्प यांना ४५ टक्के मते मिळाली आहेत. २०१० पासून चार दशकांत भारतीय समुदायाची लाेकसंख्या दुपटीने वाढली आहे. कॅलिफाॅर्निया, न्यूजर्सी, टेक्सास, व्हर्जिनिया, न्यूयाॅर्क, इलिनाॅयच्या गव्हर्नर तसेच सिनेटर निवडणुकीतही भूमिका महत्त्वाची ठरते. ६ राज्यांत १० संसदीय जागा व १५ शहरांतील महापाैर निवडणुकीत भारतीयांची निर्णायक भूमिका असते. येथील भारतीयांची भागीदारी ६ ते १८ टक्के आहे.

भारतीयांना आकर्षित करण्यासाठी ट्रम्प-बायडेन काय करताहेत?

ट्रम्प यांनी अमेरिकेत हाउडी माेदी कार्यक्रमात सहभाग घेतला हाेता. भारतात नमस्ते इंडियात सहभागी झाले हाेते. दाैऱ्यात माेदींना मित्र संबोधले. हॅरिस यांना उपराष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार बनवले. त्यांनी १४ भारतीय भाषांतून जाहिराती केल्या.

अमेरिकी निवडणुकीत भारतीय समुदायाचे महत्त्व काय?

{अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष निवडणुकीबराेबर लाेकप्रतिनिधी सभागृह व वरिष्ठ सभागृहासाठीही ही प्रक्रिया राबवली जाणार आहे. सिनेटमध्ये आता रिपब्लिकनचे वर्चस्व आहे. सिनेटच्या मंजुरीविना राष्ट्राध्यक्ष काेणतेही विधेयक मंजूर करू शकत नाहीत. दुसरे कारण म्हणजे राष्ट्राध्यक्षांच्या निवड प्रक्रियेतील इलेक्टाेरल काॅलेज सिस्टिम. त्याअंतर्गत लाेकसंख्येच्या तुलनेत प्रत्येक राज्यात इलेक्टाेरलची संख्या निश्चित करण्यात आली आहे. पक्षाला एखाद्या राज्यात ५० टक्क्यांहून जास्त इलेक्टाेरल मते मिळाल्यास त्यास राज्यातील सर्व इलेक्टाेरल मते मिळतात. टेक्सासमध्ये ३८ इलेक्टाेरल मते आहेत. ट्रम्प-बायडेन यांच्यात येथे झुंज आहे. अशा स्थितीत भारतीय समुदायाची भूमिका निर्णायक ठरेल. यंदा २० हून जास्त भारतीय वंशाचे लाेक सिनेट व काँग्रेससाठी मैदानात आहेत. २०१८ च्या मध्यावधीमध्ये ४ भारतीय काँग्रेसमध्ये निवडून आले हाेते.

स्विंग स्टेटसमध्ये लाेकसंख्या कमी, पण प्रभाव जास्त

मिशिगन, पेन्सिल्व्हेनिया, ओहिओ, फ्लोरिडा, जाॅर्जिया, नाॅर्थ कॅरोलिना, विस्काॅसिनमध्ये भारतीयांची लोकसंख्या कमी आहे. परंतु कडव्या लढतीत मात्र भारतीय समुदायाची मते किंगमेकरची भूमिका निभावतात.