आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादक्षिण कोरियात मार्चमध्ये राष्ट्रपतिपदासाठी निवडणूक होणार आहे. त्यामुळे मतदारांना आकर्षित करण्यासाठी आश्वासनांचा पाऊस पडू लागला आहे. डेमोक्रॅटिकचे उमेदवार ली-जे म्युंग यांनी सर्व उमेदवारांना प्रचारात जणू पिछाडीवर टाकले आहे. त्यांची एक घोषणा सर्वांनाच आकर्षित करत आहे. म्युंग यांनी केसगळतीवरील उपचाराचा खर्च उचलण्याचे आश्वासन दिले. सत्तेवर आल्यास सरकारी खर्चातून हा उपचार केला जाईल असे त्यांनी म्हटले आहे. दक्षिण कोरियात केसगळतीची समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येते. देशात सुमारे २० टक्के लोकांना केसगळतीचा त्रास दिसून येतो. म्युंग यांच्या आश्वासनाला मोठे समर्थन मिळाले आहे. अनेकांनी त्यांच्या या घोषणेचे स्वागत केले. कारण दक्षिण कोरियात केसगळतीवरील उपचार हा प्रचंड खर्चिक आहे.
दोन मुलांची माता जियोन दा उन म्हणाल्या, माझ्या केसगळतीला रोखण्यासाठी मला किमान दोन लाख रुपयांची गरज आहे. एवढी रक्कम मिळाली तरच मी माझ्या केसांवर योग्य पद्धतीने उपचार करू शकेल. राष्ट्रपतिपदाचे अन्य उमेदवार एहन चोल म्हणाले, म्युंग यांनी घोषणा व्यावहारिकदृष्ट्या अंमलबजावणी करण्यायोग्य नाही.
मतदारांनो, तुमच्या केसांसाठी चांगले उमेदवार..
म्युंग यांनी निवडणुकीसाठी व्हिडिआेद्वारे प्रचारावर भर दिला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिआे व्हायरल झाला आहे. त्यात मतदारांनो, म्युंग हेच तुमच्या केसांसाठी चांगले उमेदवार आहे, अशा आशयाचे दावे यातून करण्यात आले आहेत. म्युंग यांना मत देऊन त्यांना ‘इम्प्लांट’ करावेच लागेल, असे म्युंग समर्थकही पोस्ट करू लागले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.