आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परराष्‍ट्र निती:चीनसोबतचे संबंध पुन्हा दृढ करू; नवनिर्वाचित राष्ट्रपतींची ग्वाही, निवडणुकीत विरोधी नेते योल यांचा विजय

सेऊल7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • उत्तर कोरियाला चोख प्रत्युत्तर दिले जाईल, चर्चेचाही पर्याय

दक्षिण काेरियातील विरोधी पक्षनेते युन सुक योल यांची राष्ट्रपती पदावर निवड झाली आहे. त्यांनी राष्ट्रपती पदासाठी झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी उदारमतवादी प्रतिस्पर्धी ली जे म्युंग यांचा पराभव केला. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच या पदासाठी झालेली ही कडवी झुंज ठरली होती.

९९ टक्के मतमाेजणी पूर्ण झाली आहे. त्यात योल यांना ४८.६ टक्के तर त्यांचे प्रतिस्पर्धी डेमाेक्रॅटिक पार्टीचे ली जे म्युंग यांना ४७.८ टक्के मते मिळाली. योल मे मध्ये सूत्रे स्वीकारतील. राष्ट्रपती पदासाठी निवडून आल्यानंतर योल म्हणाले, आमचे सरकार अमेरिकेसोबतची भागीदारी बळकट करेल. उत्तर काेरियाला चाेख प्रत्युत्तर दिले जाईल. परंतु चर्चेचा मार्गही खुला असेल. याबरोबर चीन तसेच जपानसोबतचे संबंधही सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...