आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरघाेस प्रतिसाद:एलआयसी आयपीओ; रिटेल गुंतवणूकदारांचा संपूर्ण भरणा, ही समभाग विक्री 9 मे रोजी बंद होत आहे

नवी दिल्ली23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील सर्वात मोठा आयपीओ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एलआयसीच्या प्राथमिक समभाग विक्रीला गुंतवणूकदारांकडून भरघाेस प्रतिसाद मिळाला आहे. शुक्रवारी बाेली लावण्याच्या तिसऱ्या दिवशी पहिल्या तासातच किरकोळ विभागाचा पूर्ण भरणा झाला.

किरकोळ वैयक्तिक गुंतवणूकदारांच्या विभागासाठी ६.९ समभाग राखून ठेवण्यात आले होते, परंतु त्या तुलनेत ७.२ कोटींच्या बाेली लावण्यात आल्याचे मुंबई शेअर बाजाराने दिलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे.

पात्र संस्थात्मक खरेदीदार (क्यूआयबी) आणि बिगर संस्थात्मक गुंतवणूकदार (एनआयआय) भागाला कमी प्रतिसाद मिळत आहे. बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांचा भाग ५० टक्के सबस्क्राइब झाला होता, तर क्यूआयबीचा भाग अजूनही ४० टक्के कमी आहे.पॉलिसीधारकांचा भाग तीन पटीने सबस्क्राइब झाला, तर आरक्षित कर्मचाऱ्यांचा भाग जवळपास अडीच पटीने सबस्क्राइब झाला. एकंदरीत, आयपीओ पूर्णतः सदस्यत्वापेक्षा जास्त आहे कारण त्याला १६,२०,७८,०६७ समभागांच्या तुलनेत १७,९८,४२,९८० बोली प्राप्त झाल्या आहेत. एलअायसी आयपीओसाठी एकूण १६,२०,७८,०६७ समभाग विक्रीसाठी आणण्यात आले होते. परंतु प्रत्यक्षात त्यापेक्षा जास्त म्हणजे १७,९८,४२,९८० बाेली मिळाल्या. .

बातम्या आणखी आहेत...