आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकार्यालयात आपल्या सहकाऱ्यांशी मैत्री झाल्यावर आनंददायक आयुष्य जगण्यास मदत मिळते. हार्वर्ड स्टडी आॅफ अॅडल्ट डेव्हलपमेंटचे संचालक सायकियाट्रिस्ट रॉबर्ट वाल्डिंगर आणि मानसोपचारतज्ज्ञ मार्क शुल्ज यांनी एका पुस्तकात कार्यालयात काम करताना झालेल्या मैत्रीचे फायदे सांगितले. आपल्या ८० वर्षांच्या संशोधनाचे पुस्तकात रूपांतर केले आहे. पुस्तकाचे नाव द गुड लाइफ : लेसन फ्रॉम द वर्ल्ड्स लाँगेस्ट सायंटिफिक स्टडी ऑफ हॅपिनेस आहे. यामध्ये त्यांनी सांगितले की, ज्यांचे आपल्या सहकाऱ्यांशी चांगले संबंध होते, असे लोक आयुष्यात आनंदी होते. असे लोक भलेही आपल्या करिअरमध्ये आपले स्वप्न पूर्ण करू शकले नसले तरी ते नापसंत करणाऱ्या सहकाऱ्यांसोबत काम करणारे लोक जास्त आनंदी होते. आपण आपला जास्त वेळ सहकाऱ्यांसोबत घालवतो. अशा स्थितीत त्यांचे वर्तन आपल्याला आनंदी बनवते. सर्वात आनंदी व्यक्ती लियो लेखक होऊ शकले नाहीत, मात्र ते शिक्षक होऊन आनंदी जीवन जगत होते. कारण, ते मुले आणि शिक्षकांत राहत होते. त्यांनी अनेक पदोन्नत्या नाकारल्या होत्या. एका अन्य उदाहरणात हेन्री आणि रोसा दांपत्य आहे. त्यांना आपले काम आवडत नव्हते. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना घरी लंचसाठी बोलावणे सुरू केले. कारण, दांपत्याची त्यांच्यासोबत चांगली मैत्री होती. अन्य श्रीमंत रिसर्च सहभागींपेक्षा जास्त आनंदी होते.
८० वर्षांच्या वयात वर्क बॅलन्सवर वाटतो खेद संशोधनात आढळले की, वर्क लाइफ बॅलन्सवर लोकांना नंतर खेद वाटतो. अनेक लोकांना ८०-९०वयात असे वाटते. मायकेल आधी कामाला आयुष्याचा उद्देश समजत होते. आता ते घराला जास्त वेळ न दिल्याबद्दल खेद करतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.