आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लंडन:आयुष्य कधी कधी युद्धासमान होत असते, संपूर्ण सकारात्मकता एकवटून आव्हानांचा सामना करतो अन् जिंकतो : बेअर ग्रिल्स

लंडनएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ब्रिटिश साहसवीर बेअर ग्रिल्स पाठीच्या कण्याला झालेल्या जखमेवर घेत आहेत आइस ट्रीटमेंट

प्रख्यात साहसवीर आणि टीव्हीवरील मॅन व्हर्सेस वाइल्ड या कार्यक्रमाचे सादरकर्ता बेअर ग्रिल्स यांनी सोशल मीडियावर म्हटले आहे की, ‘२५ वर्षांपूर्वी एका साहसादरम्यान जखम झाली होती, त्यासाठी मी अद्याप उपचार घेत आहे. अजूनही मला रोज असह्य वेदना होतात.’ ग्रिल्स यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व अभिनेता अक्षयकुमार यांना आपल्या कार्यक्रमात पाहुणे म्हणून बोलावले होते. या वेदनांना ते रोज कसे पराभूत करतात हे त्यांनी पोस्टमध्ये सांगितले आहे...

२५ वर्षांपासून रोज वेदना सहन करतोय, पण हरलो नाही; जखम झाल्यानंतर दोन वर्षांतच माउंट एव्हरेस्ट फत्ते केले होते
१९९६ ची गोष्ट. तेव्हा मी झांबियाच्या एका स्कायडायव्हिंग इव्हेंटमध्ये भाग घेण्यास गेलो होतो. दुर्दैवाने पॅराशूट उघडली नाही आणि मला पाठीच्या आधारे धोकादायक लँडिंग करावे लागले. त्यामुळे पाठीच्या कण्यात फ्रॅक्चर झाले. वर्षभर फिजिओथेरपी व इतर उपचार झाले. पण अजूनही वेदना होतात. तेव्हा मी २१ वर्षांचा होतो, आज ४६ वर्षांचा आहे. रोज या असह्य वेदनांशी लढतो. वेदना शमवण्यासाठी आइस ट्रीटमेंट घेतो, ती अत्यंत त्रासदायक आहे. पण ती आवश्यक आहे. प्रत्येकाचे आयुष्य कधी कधी युद्धासमान होते. लोक ही रोमांचक लढाई लढतात. मीही त्यापैकी एक. संपूर्ण सकारात्मकता एकवटून मी या आव्हानाचा सामना करतो आणि जिंकतो. दृढ इच्छाशक्तीमुळेच जखम होऊनही मी दोन वर्षांनी माउंट एव्हरेस्ट फत्ते केले होते. तेव्हा मी हे शिखर गाठणारा सर्वात तरुण ब्रिटिश व्यक्ती ठरलो होतो.

मला कधीही भीती वाटली नाही. कारण, आयुष्यात अशा घटना वेगाने घडल्या, पण त्यांचा परिणाम दीर्घकाळ टिकला नाही. ‘अॅनिमल्स ऑन द लूज’ मालिकेच्या शूटिंगच्या वेळी तर मी मृत्यू खूप जवळून पाहिला होता. काही वेळा मागे वळून पाहिले तर असे वाटते की काही प्रसंगी मला प्राणच गमवावे लागले असते. पण सुदैवाने मी प्रत्येक वेळी बचावलो. मला पाहून संघर्षाची प्रेरणा मिळते, असे चाहते म्हणतात. एका चाहत्याने लिहिले की, मला हर्निएटेड डिस्कमुळे भयंकर वेदना होतात, पण तुमच्या सकारात्मकतेमुळे मला प्रेरणा मिळते. आणखी एकाने म्हटले की, तुम्ही खरोखरच प्रेरणादायी व्यक्ती आहात. जी साहसी कामे तुम्हाला करायची आहेत त्यासाठी मजबूत राहा.’ -बेअर ग्रिल्स

बातम्या आणखी आहेत...