आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Life! This Is My Address ... A Mother Wrote Her Name And Address On The Back Of A Two year old Girl, |Marathi News

रशिया-युक्रेन युद्धाचा मार्मिक चेहरा:आयुष्य! हा माझा पत्ता...एका आईने दोन वर्षांच्या मुलीच्या पाठीवर नाव-पत्ता लिहिला, जेणेकरून युद्धात काही झाल्यास मुलीला कुणी घरी पोहोचवू शकेल

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हे केवळ एक छायाचित्र नाही, तर भीतिदायक दृश्याचे जिवंत हस्ताक्षर आहे. सध्या युक्रेनच्या प्रत्येक शहरात आणि गल्लीत अशी दहशत सामान्य आहे. केवळ २ वर्षे ४ महिन्यांच्या वीरा माकोव्हीच्या पाठीवर तिचे नाव-पत्ता आणि संपर्क क्रमांक तिच्या आईने लिहिला आहे. कारण रशियन सैनिकांच्या हल्ल्यात आईचा मृत्यू झाल्यास किंवा तिची आपल्या मुलीपासून ताटातूट झाल्यास या मुलीला तिच्या घरच्यांपर्यंत पोहोचवता येईल. ही निरागस मुलगी अद्याप व्यवस्थित बोलूही शकत नाही. साशा नावाच्या महिलेने सोशल मीडियावर हा फोटो शेअर केला आहे. त्यांनी लिहिले- ‘ज्या दिवशी रशियाने क्षेपणास्त्रे डागण्यास सुरुवात केली त्या दिवशी (२४ फेब्रुवारी) मी थरथरणाऱ्या हातांनी मुलीच्या पाठीवर हे लिहिले होते. वीराच्या जॅकेटमध्येही एक कार्ड डाकले होते. त्यात नाव-पत्ता-संपर्क क्रमांक आदी आहे. आता मी पूर्णपणे सुरक्षित ठिकाणी आहे, परंतु ती दहशत, त्या वेदना आणि असहायता संपूर्ण जगाला दाखवू इच्छित आहे.’

बातम्या आणखी आहेत...