आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेसी बसवरून पडता पडता वाचला:चाहते बसवर तुटून पडले, अर्जेंटिनाच्या कर्णधाराला अखेर हेलिकॉप्टरने बाहेर काढावे लागले

अर्जेंटिना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

फुटबॉल विश्वचषक विजेत्या अर्जेंटिना संघाचे मंगळवारी देशातील लाखो चाहत्यांनी स्वागत केले. राजधानी ब्युनोस आयर्समध्ये हा सोहळा पार पडला. संपूर्ण टीम एका ओपन टॉप बसमध्ये बसून आनंद सोहळ्यात सामील झाले होते. यादरम्यान मोठी दुर्घटना टळली आहे. बसच्या छतावर बसलेला कर्णधार मेसीसह 5 खेळाडू पडता पडता वाचले आहेत. आनंदाच्या सोहळ्याप्रसंगी चाहत्यांची गर्दी बसकडे आल्याने मेसीला अखेर हेलिकॉप्टरमधून बाहेर काढावे लागले. अर्जेंटिनाच्या सरकारी एजन्सी टेलिमच्या म्हणण्यानुसार, ब्युनोस आयर्समधील स्मारकाच्या ठिकाणी चार लाख लोक उपस्थित होते.

ट्रॉफीला छातीशी कवटाळून मेसी झोपी गेला

फिफा विश्वचषक विजेते झाल्यानंतर अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेसीचे ट्रॉफीसोबतचे अनेक फोटो व्हायरल झाले आहेत. मेसी ट्रॉफीला छातीशी कवटाळून झोपी गेला. असा एक फोटो सद्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे हे फोटो मेसीने स्वतः ट्विटरवर पोस्ट केले आहेत. त्यात लिहले की, 'गुड मॉर्निंग' दुसरीकडे, मेसीच्या टीमचे अर्जेंटिनाच्या राजधानीत भव्य स्वागत करण्यात आले.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, असे बोलले जात आहे की, मेसीने ट्रॉफी छातीला कवटाळून तो गाढ झोपी गेला. दरम्यान, यापूर्वी मेसीचे ट्रॉफीला किस करतानाचे फोटो व्हायरल झाले होते. अर्जेंटिनाने 18 डिसेंबर रोजी फिफा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत फ्रान्सचा पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभव करून विजेतेपदावर आपला ठसा उमटविला आहे.

मेसीचे ट्रॉफीसोबतचे फोटो

लोक म्हणाले - शांत झोप
मेसीच्या या फोटोंवर सोशल मीडियावर लोकांनी मजेशीर कमेंट्स केल्या. काहींनी याला शांत झोप म्हटले तर काही म्हणाले - फुटबॉलचा राजा चांगली झोप घे, वास्तविक मेसीचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न तब्बल 16 वर्षांनंतर पूर्ण झाले आहे. मेसीचा हा पाचवा विश्वचषक होता. 2006 च्या विश्वचषक स्पर्धेत तो पहिल्यांदा अर्जेंटिना संघाचा भाग होता. मात्र अर्जेंटिनाला विश्वचषक जिंकण्यात यश मिळू शकले नाही. अर्जेंटिनाने तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकले आहे. यापूर्वी 1978 आणि 1986 मध्ये जिंकले होते.

बातम्या आणखी आहेत...