आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वॉशिंग्टन:गर्भवतीचे पाेट चिरून बाळाची चाेरी करणाऱ्या लिसाला मृत्युदंड

वॉशिंग्टन6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अमेरिकेत 68 वर्षांनी एखाद्या महिलेला अशी शिक्षा

अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने महिला गुन्हेगार लिसा माँटगोमेरीला मृत्युदंड करण्याचा न्याय विभागाचा मार्ग मोकळा केला आहे. अमेरिकेत जवळपास सात दशकांनंतर एखाद्या महिलेला मृत्युदंड देण्यात आला आहे. बुधवारी सकाळी लिसाला मृत्युदंड देण्यात आला. ५२ वर्षीय लिसाला स्थानिक वेळेनुसार १:३० वाजता मृत घोषित करण्यात आले. लिसाने २००४ मध्ये एका गर्भवती महिलेचा गळा आवळून खून केला आणि नंतर चाकूने पाेट फाडून तिच्या गर्भाशयातून आठ महिन्यांची मुलगी खेचून फरार झाली. लिसाच्या आधी अमेरिका सरकारने १८ डिसेंबर १९५३ ला बाॅनी ब्राऊन हेडीला मिसुरीमधून ६ वर्षांच्या मुलाचे अपहरण करून त्याची हत्या केल्याबद्दल मृत्युदंड दिला हाेता. अमेरिकेच्या सर्किट काेर्ट आॅफ अपीलने लिसाच्या मृत्युदंडावर बंदी घातली हाेती.

काेलंबियाच्या यूएस सर्किट काेर्ट अपीलनेही बंदी घातली हाेती, जी सर्वाेच्च न्यायालयाने हटवली. फेडरल ब्युराे आॅफ प्रिझनच्या निर्णयाची प्रत मिळताच लिसाला मृत्युदंड देण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...