आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Little Island Garden Opens , Built On The River At A Cost Of Rs 1900 Crore, 350 Species Of Plants, 65 Species Of Grass

अमेरिका:1900 कोटी खर्चून नदीवर उभारलेले उद्यान खुले, 350 प्रजातींच्या वनस्पती, ६५ प्रजातींचे गवत

जेम्स टार्मी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 687 आसनी प्रेक्षागृह, 132 ट्युलिपसारखी खांबांवर उद्यानाची निर्मिती

अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये हडसन नदीवरील उद्यान शुक्रवारी सर्वांसाठी खुले करण्यात आले. २.४ एकर क्षेत्रफळ असलेल्या उद्यानाला लिटल आयलँड असे नाव देण्यात आले आहे. कारण, हे उद्यान रस्त्यापेक्षा ६० मीटर उंच वसलेले आहे. हे उद्यान ट्युलिप फुलाच्या आकारातील काँक्रीकटच्या १३२ खांबांनी साकारले आहे.

उद्यानात ३५० प्रजातींची झाडे, ६५ प्रजातींचे गवत, ५० प्रजातींचे इतर वनस्पती लावलेल्या आहेत. येथे एक क्रीडा मैदान व ६८७ आसनी प्रेक्षागृहदेखील आहे. हे उद्यान सरकार किंवा स्थानिक प्रशासनाने नव्हे, तर ७१ वर्षीय अमेरिकी अब्जाधीश बॅरी डिलर यांनी तयार केले आहे. २०१३ मध्ये उद्यानाची पायाभरणी झाली होती. हे उद्यान प्रत्यक्षात साकारण्यासाठी सुमारे १९०० कोटी रुपये खर्च झाले. बॅरी डिलर म्हणाले, कोरोना काळात लोक मानसिकदृष्ट्या त्रस्त आहेत. हे उद्यान अशा लोकांसाठी संजीवनीचे काम करेल.

उद्यानास विरोध, ७ वर्षे प्रकरण न्यायालयात
उद्यानाबाबत बॅरी डिलर म्हणाले, न्यूयॉर्कमध्ये संघर्षाविना काहीही साकारत नाही. लिटल आयलँड तयार करण्यासाठी कोर्टात सात वर्षे खटला लढावा लागला. काही विरोधकांनी हे उद्यान होऊ नये यासाठी कुरापती केल्या. उद्यान असलेल्या ठिकाणी पियर-५४ जहाज उभे राहत होते. १९१२ मध्ये टायटॅनिक दुर्घटनेत वाचलेल्यांना पियर-५४ जहाजाने आणण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...