आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
फ्रान्सचे डिजाेन शहराचे ५७ वर्षीय अलाइन काेक दुर्धर आजाराने ग्रस्त आणि त्रस्त आहेत. आजारावर काही उपचार आढळून येत नसल्याने त्यांनी फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्राॅन यांच्याकडे इच्छामृत्यूचे साकडे घातले. परंतु राष्ट्रपतींनी काेक यांची मागणी फेटाळून लावली. आता काेक यांनी अन्नपाणी साेडले आहे. साेबतच शनिवारी सकाळी फेसबुकवरून आपल्या मृत्यूची लाइव्ह स्ट्रीमिंग सुरू केली. मी एक आठवड्यापेक्षा जास्त दिवस जगू शकणार नाही. वेळ जाताेय तसतशी माझ्यातील बेचैनी वाढत चालली आहे, असे काेकने म्हटले आहे. काेक यांनी मॅक्राॅन यांच्याकडे पत्राद्वारे इच्छामृत्यूची मागणी केली हाेती. काेणताही उपचार नसलेल्या आजाराने मी पीडित आहे. मला असह्य वेदना हाेत आहेत. मी शांतपणे मृत्यूला सामाेरे जाईल, असा काहीतरी पदार्थ द्यावा, अशी विनंती त्यांनी केली हाेती. त्यावर इच्छामृत्यूची परवानगी देता येणार नसल्याचे सांगून मॅक्राॅन यांनी समजावण्याचा प्रयत्न केला. फ्रान्सच्या कायद्यानुसार मला परवानगीचा अधिकार नाही. कारण कायद्यापेक्षा मी माेठा नाही. त्यामुळे मी विनंती स्वीकारू शकत नाही, असे राष्ट्रपतींनी स्पष्ट केले हाेते. राष्ट्रपतींचे उत्तर मिळताच काेक यांनी शुक्रवारी मृत्यूची लाइव्ह स्ट्रिमिंग करण्याची घाेषणा केली आणि शनिवारपासून ती सुरू झाली. मृत्यूच्या लाइव्ह स्ट्रिमिंगद्वारे लाेकांमध्ये जागृती आणू इच्छिताे. आजाराने पीडित लाेकांना वेदना मुक्त करायचे असल्यास त्यांना इच्छा मृत्यूची परवानगी दिली पाहिजे, असे काेक यांनी म्हटले आहे.
इच्छामृत्यूची परवानगी न देणाऱ्या युराेपीय देशांत फ्रान्सचा समावेश हाेताे. कॅथाॅलिक चर्चचा पुढाकार व व्यापक सामाजिक प्रभावाचा परिणाम म्हणून त्याकडे पाहिले जाते. आपल्या अंतिम क्षणी रुग्णांना बेशुद्ध करून ठेवले जाऊ शकते, अशा रुग्णांना अंतिम क्षणी इच्छा मृत्यूची परवानगी दिली जात नाही. २०१६ मध्ये तयार एका कायद्यानुसार ही तरतूद आहे.
काेक गेल्या ३४ वर्षांपासून आजारी आहेत. ते अंथरुणावर पडून असतात. माझ्या मृत्यूला संस्मरणीय करू इच्छिताे. माझ्या मृत्यूला संपूर्ण जगाने स्मरणात ठेवावे, अशी इच्छा आहे. त्यातून फ्रान्सच्या कायद्यात इच्छा मृत्यूबाबत परिवर्तनाची शक्यता निर्माण व्हावी असे वाटते. त्यांच्या या इच्छेचा आम्ही सन्मान करताे, असे राष्ट्रपतींनी प्रतिक्रियेत म्हटले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.