आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लंडन:प्रदूषित शहरांत वास्तव्यामुळे महिलांत हृदयविकाराचा धोका 43 टक्के वाढतो

लंडन15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वीस वर्षांत २० हजार परिचारिकांच्या प्रकृतीची निगराणी

प्रदूषण आपल्या प्रकृतीसाठी घातक ठरत आहे. त्याचा सर्वाधिक धाेका हृदयक्रियेच्या दृष्टीने आहे. महिलांसाठी झालेल्या ताज्या अध्ययनातून हा दावा करण्यात आला आहे. त्यानुसार महिला तीन वर्षांपर्यंत प्रदूषित शहरात वास्तव्याला राहिल्यास त्यांना हृदयक्रिया बंद पडण्याच्या समस्येला ताेंड द्यावे लागू शकते. ही जाेखीम ४३ टक्क्याने वाढते. त्याशिवाय डिमेन्शिया, स्थूलपणा इत्यादी आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामागेही प्रदूषण हे कारण ठरते. कोपेनहेगन विद्यापीठातील एका अभ्यासात डेन्मार्कच्या परिचारिकांचे १५ ते २० वर्षांपर्यंत अध्ययन करण्यात आले. १९९३-९९ या काळात २० हजारांहून जास्त परिचारिकांची माहिती संकलित करण्यात आली. पीएम २.५ मध्ये (डिझेल-पेट्रोलमधून निघणारे प्रदूषणाचे कण) ५.१ मायक्रोग्रॅम प्रति घन मीटर वाढीमुळे महिलांमध्ये हृदयक्रिया बंद पडण्याचा धोका १७ टक्के वाढला.

अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या अभ्यासानुसार हवेतील प्रदूषणामुळे धमन्या कडक होणे, रक्तातील गुठळ्यांची भीती असते. डॉ. यून ही लीन म्हणाल्या, ब्रिटनमध्ये नऊ लाखांहून जास्त व अमेरिकेत सुमारे २.८ कोटी लोक त्याच्या जोखीम क्षेत्रात येतात.

बातम्या आणखी आहेत...