आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चर्चेतील व्यक्तिमत्त्व - मेरी एलिझाबेथ ट्रस:स्वतःचेच नाव नापसंत, घूमजाव करण्याचे ट्रॅक रेकाॅर्ड, लेखिकादेखील आहेत लिझ

ऑक्सफर्डएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जन्म : २६ जुलै १९७५, ऑक्सफर्ड शिक्षण : ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतून पदवी प्राप्त केली कुटुंब : पती ह्यूग ओ’ लेरी, दोन मुली - फ्रान्सेस आणि लिबर्टी मालमत्ता : ८० कोटी रु. विविध मीडिया रिपोर्ट््सनुसार

लिझ ट्रस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेरी एलिझाबेथ ट्रस आता ब्रिटनच्या नवीन पंतप्रधान आहेत. वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी त्यांनी शाळेत पंतप्रधानाची भूमिका केली. त्यांनी ब्रिटनच्या माजी पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांची भूमिका साकारली होती. आता त्या थॅचर यांच्या खऱ्या वारस असल्याचे सांगतात. त्यांनी स्वतःला थॅचरच्या उत्तराधिकारी म्हटले असले तरी १९८० च्या दशकात त्या थॅचर सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यासाठी आई प्रिसिला यांच्यासोबत सहभागी होत असत.

२०१९ मध्ये एका मुलाखतीत ट्रस यांनी सांगितले होते की, त्या पहिल्यांदा शाळेत गेल्या तेव्हा त्यांच्या शाळेच्या बॅजवर मेरी एलिझाबेथ लिहिले होते. त्यांनी शिक्षिकेकडे जाऊन मेरी हे नाव काढून टाकण्यास सांगितले. ट्रस यांच्या मते, त्यांना हे नाव आवडत नव्हते. महाविद्यालयीन काळापासून त्या राजकारणात सक्रिय होत्या, सुरुवातीला त्या डाव्या गटाच्या लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाशी संबंधित होत्या. त्यांनी पक्षाच्या अधिवेशनांमध्ये राजेशाही नष्ट करण्याचे समर्थन केले. नंतर त्यांनी कंझर्व्हेटिव्ह पक्षात प्रवेश केला. त्याचप्रमाणे युरोपियन युनियनमधून ब्रिटन बाहेर पडताना (ब्रेक्झिट) लिझ यांचा विरोध होता, पण ब्रिटनचे लोक त्याच्या बाजूने आले तेव्हा त्यांनी त्याला पाठिंबा देण्यास सुरुवात केली.

राजकारणी तसेच लिझ “द व्हॅल्यू ऑफ मॅथेमॅटिक्स”, “रिस्क बिझनेस” यासह सात पुस्तकांच्या लेखिकादेखील आहेत. लिझ यांना चीज खायला आवडते. त्यांनी आपल्या भाषणातही याचा उल्लेख केला आहे.

कुटुंब : जन्मानंतर ४ वर्षांनी स्कॉटलंडला स्थलांतरित लिझ यांचे वडील जॉन केनेथ ट्रस हे गणिताचे प्राध्यापक होते आणि आई प्रिसिला ट्रस परिचारिका होत्या. त्यांना तीन लहान भाऊ आहेत. त्या ४ वर्षांच्या असताना त्यांचे कुटुंब स्कॉटलंडला गेले. येथे त्यांनी वेस्ट प्रायमरी व राउंडहे स्कूलमध्ये शिक्षण घेतले. नंतर ऑक्सफर्ड विद्यापीठातून तत्त्वज्ञान आणि राज्यशास्त्रात पदवी प्राप्त केली. २००० मध्ये त्यांनी अकाउंटंट ह्यूग ओ’लेरीशी लग्न केले. त्यांना दोन मुली आहेत. त्यांचे पालक डावे आहेत. ट्रस पहिल्यांदा कंझर्व्हेटिव्ह उमेदवार म्हणून निवडणूक लढल्या तेव्हा त्यांचे वडील जॉन केनेथ यांनी त्यांच्यासाठी प्रचार करण्यास नकार दिला. तथापि, आईने त्यांचा प्रचार केला. आई त्यांना लहानपणी सरकारविरोधी निदर्शनांत घेऊन जायची.

करिअर : केबल अँड वायरलेस कंपनीमध्ये आर्थिक संचालक १९९६ ते २००० पर्यंत ट्रस यांनी “शेल” कंपनीत काम केले. त्यानंतर २००० मध्ये केबल अँड वायरलेस कंपनीत रुजू झाल्या. दरम्यान, २००१ च्या सार्वत्रिक निवडणुकीत हेम्सवर्थ वेस्ट यॉर्कशायरमधून टोरी पक्षाच्या उमेदवार म्हणून उभ्या राहिल्या, परंतु त्यांचा पराभव झाला. यानंतर २००५ मध्ये पुन्हा एकदा वेस्ट यॉर्कशायरमधून निवडणूक लढवली, पण पुन्हा पराभव झाला. २००६ मध्ये त्या दक्षिण पूर्व लंडनच्या ग्रीनविच शहरातून कौन्सिलर म्हणून निवडून आल्या. तथापि, २००८ मध्ये त्या रिफाॅर्म कंपनीच्या पूर्णवेळ उपसंचालक झाल्या. २०१० मध्ये खासदारकीची निवडणूक लढवली आणि जिंकली. २०१२ मध्ये खासदार झाल्यानंतर अवघ्या दोन वर्षांनी त्या सरकारमध्ये शिक्षणमंत्री झाल्या. त्यानंतर २०१४ मध्ये त्यांना पर्यावरण सचिव करण्यात आले. २०१६ मध्ये त्या पहिल्या महिला लॉर्ड चान्सलर आणि न्याय सचिव झाल्या. २०१९ मध्ये बोरिस जॉन्सन पंतप्रधान झाल्यावर त्यांना आंतरराष्ट्रीय व्यापार सचिव करण्यात आले. २०२१ मध्ये त्या परराष्ट्र सचिव झाल्या. आणि आता बोरिस जॉन्सन यांच्या राजीनाम्यानंतर त्यांची पंतप्रधानपदी निवड झाली आहे.

चीज खूप आवडते, विवाहबाह्य संबंधात अडकल्या रंजक : चीज व ब्लॅकबेरी फोन आवडतो -त्यांना चीज आवडते. एकदा त्या म्हणाल्या की, कॉन्फरन्समध्ये त्यांना चीजवर बोलण्यास बंदी घालण्यात आली होती. -ट्रस आॅन रेकॉर्ड कराओके गायिका आहेत. -ब्लॅकबेरी पर्सन, आयर्न लेडी आणि मार्गारेट थॅचरच्या वारस म्हणवून घेतात. - वयाच्या ७ व्या वर्षी शाळेत मॉक इलेक्शनमध्ये पंतप्रधानपदाची निवडणूक लढवली होती.

वाद : चुकीच्या माहितीसह रशियाशी संघर्ष गृहमंत्री पदावर असताना रोस्तोव्ह व वोरोनेशवर रशियाचा अधिकार आहे, हे त्यांना माहीतही नव्हते. येथे रशियन सैन्य जमल्यावर त्यांची रशियाशी टक्कर झाली. -२००४-०५ मध्ये कन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे विवाहित खासदार मार्क फील्डशी त्यांचे विवाहबाह्य संबंध होते. - २०२२ मध्ये एका निवेदनात त्या म्हणाल्या की, मी ख्रिश्चन धर्मावर विश्वास ठेवते, परंतु धार्मिक कार्य नियमितपणे करत नाही.

बातम्या आणखी आहेत...