आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Liz Truss Beats New Prime Minister Birten | Rishi Sunak, 96 Year Old Queen To Swear In 15th Prime Minister

ब्रिटनचा 'ट्रस'वर ट्रस्ट:लिझ ट्रस नव्या पंतप्रधान, ऋषी सुनक यांच्यावर मात, 96 वर्षीय महाराणी आयुष्यात 15 व्या पंतप्रधानांना देणार शपथ

लंडन24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

४७ वर्षीय लिझ ट्रस यांची ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे. त्यांनी भारतीय वंशाच्या ऋषी सुनक यांना पिछाडीवर टाकले. ट्रस यांना पक्षातून 81,326 (57.4%) आणि सुनक यांना 60,399 मते (42.6%) मिळाली. मार्गारेट थॅचर आणि थेरेसा मे यांच्यानंतर ब्रिटनच्या पंतप्रधान झालेल्या ट्रस या तिसऱ्या महिला आहेत. हुजूर पक्षाच्या खासदारांनी सुनक यांना ट्रसच्या तुलनेत 12% जास्त मते दिली.

परंतु कार्यकर्त्यांनी (टोरी मतदार) यांनी ट्रस आघाडी मिळवून दिली. हुजूर पक्षात 85% सदस्य मूळ ब्रिटिश व्यक्तीलाच पसंती देतात. सुनक यांच्या पराभवाचे ते प्रमुख कारण ठरले. तुल्यबळ लढत दिल्याबद्दल ट्रस यांनी सुनक यांचे कौतुक केले. विजयानंतर त्यांनी माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचेही आभार मानले. ट्रस या जान्सन यांच्या गटातील आहेत. परंतु खासदारांत त्या फारशा लोकप्रिय व प्रभावी नाहीत.

‘हुजूर पक्ष एका कुटुंबासारखा आहे. आम्ही लिझ यांच्या पाठीशी आहोत. कारण त्या कठीण काळात देश चालवतील.- ऋषी सुनक

ट्रस यांची आधीच घोषणा - भारताशी मुक्त व्यापार करार दिवाळीपर्यंत

संरक्षण क्षेत्रात मजबूत संबंध शक्य

सुनक पराभूत झाले तरीही ट्रस यांनी भारतासोबत संबंधांना नवे परिमाण देण्याचे वचन दिले आहे. पंतप्रधान झाल्यानंतर भारतासोबत व्यापार आणि संरक्षण क्षेत्रातील संबंध अधिक मजबूत केले जातील. रशियन शस्त्रास्त्रांवर भारत 60% अवलंबून आहे. चीन-रशिया मैत्री अधिक दृढ होत असताना भारत आणि ब्रिटन जवळ येणे गरजेचे आहे.

दिवाळीपर्यंत भारतासोबत मुक्त व्यापार

करार केला जाईल, असे वचन ट्रस यांनी दिले आहे. जैवविज्ञान, तंत्रज्ञान आणि कृषी क्षेत्राचा मुक्त व्यापारात समावेश करण्याचा प्रयत्न करेल, असे त्या म्हणाल्या होत्या. भारत-ब्रिटन द्विपक्षीय व्यापार 4 कोटी रुपयांचा आहे. मुक्त व्यापार करारानंतर कर सवलत अधिक मिळेल.

भारतीयांसाठी व्हिसा मिळणे सोपे

लिझ ट्रस ब्रिटनची व्हिसा प्रणाली अधिक सोपी करण्याच्या योजनेवर काम करीत आहेत,असे आंतरराष्ट्रीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. भारतात जगातील सर्वात चांगले अन् प्रतिभावान लोक आहेत,असे गौरवोद्गार ट्रस यांनी काढले होते. प्रचारादरम्यान त्यांनी वारंवार भारत भेटीची इच्छा व्यक्त केली होती.

प्रीती यांचा राजीनामा, सुएला यांना संधी

गृहमंत्री प्रीती पटेल यांनी सोमवारी राजीनामा दिला. त्या सुनक यांच्या निकटवर्तीय होत्या. ट्रस आता भारतीय वंशाच्या सुएला ब्रेव्हरमन यांना कॅबिनेटमध्ये संधी देऊ शकतात. सध्या त्या अॅटर्नी जनरल आहेत.

बातम्या आणखी आहेत...