आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बांधकामाचा वाद:बांगलादेशातील स्थानिकांची चिनी नागरिकांना मारहाण

पिरोजपूर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बांगलादेशातील पिरोजपूरमध्ये बांधकाम वादातून स्थानिक लोकांनी ३ चिनी नागरिकांना मारहाण केली. मठबरिया नदीकाठी चीनच्या कंपनीकडून काही दिवसांपासून बांधकाम केले जात असल्याचे समजते. यावरून स्थानिक लोकांमध्ये रोष आहे. बुधवारी स्थानिक लोक घटनास्थळी गोळा झाले आणि चिनी कंपनीच्या बांधकामास विरोध केला. वाद वाढल्यानंतर दोन्ही गट समोरासमोर आले. स्थानिक लोकांच्या मारहाणीमुळे चिनी कंपनीचा एक व्यवस्थापक आणि सुपरव्हायझर जखमी झाले. एका चिनी नागरिकाच्या डोक्याला मार लागला. पिरोजपूर पोलिस अधीक्षकांच्या मते, मारहाणीत सहा स्थानिक लोकही जखमी झाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...