आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनाचे संकट:चीनमध्ये 5 दिवसांत 20 शहरांत लॉकडाऊन, चीनमध्ये 21 कोटी लोकसंख्या घरात कैद

10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाकाळाच्या अडीच वर्षांनंतर संपूर्ण जग खुले झाले आहे. चीन वगळता कोणत्याही देशात लॉकडाऊन लागू नाही. चीनमध्ये पाच दिवसांत आणखी २० शहरांत लॉकडाऊन लागू करण्यात आला. चीनमधील लॉकडाऊन असलेल्या शहरांची एकूण संख्या ४६ वर गेली आहे. लॉकडाऊनमध्ये असलेल्या लोकसंख्याही २१ कोटींहून ३४ कोटी एवढी झाली. चीन झीरो कोविड धोरण कठोरपणे लागू करण्याचा प्रयत्न करत आहे.

परंतु प्रत्यक्षात त्याचा काही परिणाम दिसत नाही. सुमारे २.५ कोटी लोकसंख्येच्या शांघाय शहरात आधीपासून लॉकडाऊन लागू आहे. आता २.१५ कोटी लोकसंख्येच्या राजधानी बीजिंगमध्येही लॉकडाऊनचे संकट आहे. शांघायमध्ये अजूनही दररोज सुमारे १२ हजार लोक पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. बीजिंगमधील वाईट परिस्थिती लक्षात घेऊन सरकारने संपूर्ण शहराच्या कोरोना तपासणीचे आदेश दिले आहेत. म्हणूनच बीजिंगमध्ये रोज तपासणीसाठी रांगाच रांगा दिसू लागल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...