आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Lockdown In 26 Chinese Cities, 21 Million Homes, May Day Not First In 73 Years, President Jinping's Silence On Zero Covid Policy

ड्रॅगन आयसोलेट:चीनच्या 26 शहरांमध्ये लॉकडाऊन, 21 कोटी लोक घरांत, 73 वर्षांत प्रथमच मे दिन नाही

चीनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सर्व उपाय करूनही चीन कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळवण्यात अपयशी ठरत आहे. चीनच्या २६ शहरांत अंशत:, अर्ध किंवा पूर्ण लॉकडाऊन लागले आहे. २१ कोटी लोक घरात कैद आहेत. १ मे रोजी होणाऱ्या मजूर दिनाच्या सार्वजनिक कार्यक्रमांवरही बंदी आहे. चीनच्या मागील ७३ वर्षांच्या इतिहासात प्रथमच मे दिनाचे आयोजन झाले नाही. आर्थिक राजधानी शांघायमध्ये कडक लॉकडाऊन आणि बीजिंगमध्ये कोरोना रुग्ण कमी होत नसतानाही चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग या मुद्द्यांवर मौन बाळगून आहेत. एप्रिलमध्ये जिनपिंग यांनी अनेक सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावली, पण कोरोना किंवा लॉकडाऊनबाबत कोणतेच वक्तव्य केले नाही. इतकेच नाही तर २.५ कोटी लोकसंख्येच्या शांघायच्या लोकांना टीव्हीवरही संबोधित केले नाही. चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या मुखपत्राचे माजी संपादक डेंग युवेन सांगतात, जिनपिंग असे जाणीवपूर्वक करत आहेत. कारण लोकांमध्ये लॉकडाऊन व इतर निर्बंधांबाबत रोष आहे.

८ प्रांतांमध्ये २ महिन्यांपासून शाळा बंद, मुलांची चाचणी
चीनच्या झिजिंगयान, जिलिन, शांघाय, बीजिंगसह ८ प्रांतांत सुमारे २ महिन्यापासून शाळा बंद आहेत. इथे ओमायक्रॉनमुळे रुग्ण वाढत आहेत. जिनपिंग सरकारने या प्रांतांतील शाळांत शिकणाऱ्या प्राथमिक मुलांच्या कोरोना चाचणीचे आदेश दिले आहेत. मुलांना घरातून आणत चाचणी होत आहे.

चीनच्या अनेक शहरांत लॉकडाउनमुळे लोकांचे जीवनावश्यक वस्तुंअभावी हाल होत आहेत. राष्ट्रपती जिनपिंग यांनी आधी सुमारे ७५ लाख सरकारी कर्मचाऱ्यांना मदत साहित्य वाटप आणि इतर कार्यांत जुंपले. मात्र, सरकारी कर्मचाऱ्यांची संख्या कमी पडल्याने आता कम्युनिस्ट पक्षाच्या जवळपास ५० लाख कार्यकर्त्यांना मैदान उतरवले आहे. जिनपिंग यांना नाइलाजाने असे करावे लागत आहे. कारण भलेही ते लॉकडाउन व अन्य निर्बांधांबाबत वक्तव्य करत नसतील, पण त्यांना लोकांमधील रोष माहीत आहे. वर्षअखेरीस त्यांना आपल्या तिसऱ्या कार्यकाळासाठी पॉलिट ब्यूरोमध्ये बोलवायचे आहे.

लॉकडाऊनचा चीनच्या २२% जीडीपीवर होतोय परिणाम
२६ शहरांत लॉकडाऊनमुळे चीनच्या २२ टक्के जीडीपीवर परिणाम होत आहे. अशा वेळी चीनच्या ११२६ लाख कोटींच्या एकूण जीडीपीपैकी २४७ लाख कोटींची अर्थव्यवस्था प्रभावित होत आहे. एप्रिलच्या आकडेवारीनुसार चीनचे मॅन्युफॅक्चरिंग आऊटपुटही गेल्या दोन वर्षांत सर्वात कमी राहिले.

सरकारी कर्मचारी कमी पडले, कम्युनिस्ट कार्यकर्ते मैदानात उतरले
२.१ कोटी लोकांची बीजिंग शहरात कोरोना चाचणी केली जाईल, १५ हजार चाचणी केंद्रे
चीनमध्ये १ ते ५ मेपर्यंत सुटी. लोकांना बाहेर निघण्यास मनाई. हॉटेल-रेस्टॉरंट बंद, घरीच जेवण बनवण्याचे निर्देश

बातम्या आणखी आहेत...