आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
चीनमध्ये काेरोना संसर्गाचे संकट पुन्हा वाढले आहे. राजधानी बीजिंगमध्ये गेल्या चोवीस तासांत २१ नवे रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या पाच दिवसांत येथे कोरोनाच्या १३७ रुग्णांची नोंद झाली आहे. हे लक्षात घेऊन बीजिंगजवळील २७ शहरे लॉकडाऊन करण्यात आली आहेत.
९० हजारांहून जास्त लोकांची तपासणी करण्यात आली आहे. त्याशिवाय येथील १२५५ देशांतर्गत विमान उड्डाणे रद्द झाली. हे प्रमाण सुमारे ७० टक्के आहे. रेल्वेसेवाही रद्द करण्यात आली आहे. याआधी प्राथमिक व माध्यमिक शाळांना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता महाविद्यालयीन विद्यार्थ्यांप्रमाणेच शालेय विद्यार्थ्यांचेदेखील ऑनलाइन अध्यापन होईल, असे सांगण्यात येत होते. ही कोरोनाची दुसरी लाट असल्याचे तज्ञांना वाटते. सरकारकडून मात्र त्यास दुजोरा मिळू शकलेला नाही. मंगळवारी कोरोनाचे नवे ५५ रुग्ण आढळून आल्याचे चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने (एनएचसी) बुधवारी स्पष्ट केले. या रुग्णांमध्ये लक्षणे दिसून आली नाहीत. बीजिंग-३१, हुबेई-१, झेजियांग-१ रुग्ण आढळून आला. बीजिंगमध्ये साेमवारी १०६ रुग्ण आढळल.े
सन बेल्टमध्ये कोरोना रुग्णांची विक्रमी संख्या
अमेरिकेत सन बेल्ट म्हणून आेळखल्या जाणाऱ्या भागांत संसर्ग वाढत चालला आहे. अशी तीन राज्ये आहेत. अॅरिझोना-२३९२, फ्लोरिडा-२७८३, टेक्सास- २६२२ रुग्ण नोंदवण्यात आले. या तीनही राज्यांत गेल्या काही दिवसांत तपासणीदेखील वाढवण्यात आली आहे. िनयमांत शिथिलता दिल्यामुळे रुग्णसंख्या वाढल्याचे सांगितले जाते.
२४ दिवसांनंतर 2 रुग्ण आढळले, सीमेवर सैन्य
वेलिंग्टन । कोरोनाविरुद्धची लढाई जिंकणाऱ्या न्यूझीलंडमध्ये २४ दिवसांनंतर दोन रुग्ण आढळून आले आहेत. दोन्ही रुग्ण अलीकडेच ब्रिटनमधून परतले होते, असे सरकारने स्पष्ट केले. रुग्ण आढळून येत नसल्यामुळे सरकारने आर्थिक तसेच सामाजिक प्रतिबंध हटवले होते. मात्र काही दिवसांत जास्त रुग्ण आढळतील, असा इशारा पंतप्रधान जेसिंडा यांनी दिला होता.
तुर्की : डिस्टन्सिंगसाठी रेस्तराँने बनवले घुमट
छायाचित्र इस्तंबूलचे आहे. येथे डिस्टन्सिंगसाठी एका रेस्तराँने घुमटाच्या आकारातील डायनिंग एरिया तयार केला. तुर्कीने मंगळवारीच अनलॉकची घोषणा केली आहे. देशात १.८१ लाख बाधित असून ४ हजार ८४२ जणांचा मृत्यू झाला आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.