आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Lockdown In India Necessary To Break Corona's Peace, Hurry To Declare Victory From Epidemic;n News And Live Udpates

अमेरिकन सल्लागारांचा भारताला सल्ला:अँथनी फॉसी म्हणाले, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी भारतात लॉकडाऊनची गरज

नवी दिल्ली/ वॉशिंग्‍टनएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 6 महिन्यांसाठी आंशिक लॉकडाउन आवश्यक नाही

भारत देशातील कोरोनाची वाढती साखळी तोडण्यासाठी देशात अजून काही आठवड्यांचा लॉकडाऊन लावणे गरजेचे असल्याचे मत अमेरिकन सल्लागार अँथनी फॉसी यांनी म्हटले आहे. दरम्यान, त्यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत हे सांगितले आहे.फॉसी पुढे म्हणाले की, भारत देशात कोरोना महामारीचा संसर्ग कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. दरम्यान, त्यांनी देशातील ऑक्सिजनचा पुरवठा, अत्यावश्यक औषधी आणि पीपीई किटच्या उत्पादनावर ज्यास्तीतजास्त भर देण्यास सांगितले आहे.

अँथनी फॉसी हे बायडन प्रशासनातील मुख्य वैद्यकीय सल्लागार आहेत. फॉसी यांच्या मते, भारत देशातील कोरोनाची वाढती पार्श्वभूमी लक्षात घेता एक गट तयार केले पाहिजे. जे अडचणी समजून घेत त्यावर काम करतील. भारताने कोरोनाची लाट जाण्यापूर्वीच विजयाची घोषणा केली असल्याचे ते म्हणाले.

फॉऊची यांच्या मुलाखतीतील मुख्य गोष्टी

6 महिन्यांसाठी आंशिक लॉकडाउन आवश्यक नाही

फॉसी यांनी लॉकडाऊन संदर्भात सांगितले की, गेल्या वर्षी चीनमध्ये कोरोना स्फोट झाला तेव्हा तेथे संपूर्ण लॉकडाऊन होता. ते म्हणाले की 6 महिने सर्व काही थांबविणे आवश्यक नाही. परंतु काही दिवस आंशिक लॉकडाउन आवश्यक करावे लागतील ज्यामुळे परिस्थितीत सुधारणा होईल.

भारतात आरोग्य सुविधा नसल्यामुळे मृत्यूमुखी पडले

देशात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच आहे. दरम्यान, यामुळे देशात ऑक्सिजनसह अत्यावश्यक सामग्रींची कमतरता भासत होती. लोकांना वेळेवर उपचार न मिळल्यामुळे कित्येक लोकांचा जीव गेला आहे. यामध्ये ऑक्सिजन अभावी काही लोकांना प्राण गमवावे लागेल आहे.

ऑक्सिजन शोधत असलेले लोक ऐकले
फॉसी म्हणाले की, रूग्णाच्या कुटुंबीय ऑक्सिजनचे व्यवस्थापन केल्यावरही त्यांना रुग्णालयात दाखल केले जात नव्हते. मी रस्त्यावर काही लोक त्यांचे पालक, बहिणी आणि भावांसाठी ऑक्सिजन शोधत असल्याचे ऐकले. येथे कोणतीही संस्था आणि मध्यवर्ती संस्था कार्यरत नसल्याचे लोकांना वाटत असल्याचे ते म्हणाले.

लसीकरण महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते

कोरोना व्हायरसच्या या समस्येवर उपाय म्हणून लस महत्वाची भूमिका बजावू शकते असे ते म्हणाले. ते पुढे बोलताना म्हणाले की, 1.40 कोटी लोकसंख्या असलेल्या देशात आतापर्यंत फक्त 2.4% लोक लसीकरण झाले आहेत. यासाठी लवकरात लवकर पुरवठा वाढवण्याची गरज असून जगातील इतर कंपन्यांशी करार करावा लागेल. ते म्हणाले की, लस तयार करण्याच्या क्षेत्रात भारत आघाडीचा देश आहे.

बातम्या आणखी आहेत...