आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Lockdown Possible In New York Due To Chaos Of Trump Supporters; There Is A Possibility Of Agitation Across The Country During The Hearing On April 4

अमेरिका:ट्रम्प समर्थकांच्या गोंधळामुळे न्यूयॉर्कमध्ये लॉकडाऊन शक्य ; सुनावणीदरम्यान देशभरात आंदोलनाची शक्यता

न्यूयॉर्क2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पॉर्न स्टारला पैसे दिल्याच्या प्रकरणात फौजदारी खटल्याचा सामना करणारे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मंगळवारी न्यूयॉर्कच्या न्यायालयात हजर होतील. अमेरिकी सुरक्षा संस्थांनी या दिवशी देशभरात आंदोलनाची शक्यता व्यक्त केली आहे. ट्रम्प समर्थक रिपब्लिकन काँग्रेस सदस्य मर्जोरी टेलर ग्रीन यांनी समर्थकांना आवाहन करत सांगितले की, ते पुढील आठवड्यात न्यूयॉर्कमध्ये असतील. यामुळे राजधानी वॉशिंग्टनपासून न्यूयॉर्क छावणीत रूपांतरीत होत आहे. ज्या न्यायालयात ट्रम्प हजर होणार आहेत, त्यातील अन्य प्रकरणे लांबणीवर टाकली आहेत. वॉशिंग्टनमध्ये अमेरिकी संसद कॅपिटल हिलचीही सुरक्षा वाढवली आहे.

ट्रम्प यांच्या निवडणुकीतील पराभवानंतर त्यांच्या समर्थकांनी कॅपिटल हिलवर हल्ला केला होता. सुरक्षेमुळे ट्रम्प यांची सुनावणी मंगळवारपर्यंत लांबणीवर टाकली. त्या दिवशी ते शरण आल्यानंतर अपील दाखल करतील. त्यांच्या अटकेची शक्यता नाही. डिस्ट्रिक्ट अॅटर्नी यांनी शुक्रवारीच ट्रम्प यांना आत्मसमर्पण करण्याची मागणी केली होती. मात्र, सुरक्षा व्यवस्थेसाठी लागणारा वेळ पाहता हा अवधी मंगळवारपर्यंत वाढवला.अधिकाऱ्यांनुसार, एफबीआय, सीक्रेट सर्व्हिस आणि अन्य अनेक संस्था सुरक्षेबाबत काम करत आहेत.

२४ तासांत निवडणुकीसाठी ४० लाख डॉलर जमा ट्रम्प यांच्या टीमने आरोप निश्चित झाल्यानंतर २४ तासांच्या आत निवडणूक मोहिमेसाठी ४० लाख डॉलर रक्कम जमा केली. यात २५% रक्कम पहिल्यांदा निवडणूक निधी देणाऱ्यांची असल्याचा दावा करण्यात आला आहे.

आरोप निश्चितीनंतर ट्रम्प विरोधकही समर्थनार्थ उतरले ट्रम्प यांचे कट्टर विराेधकही त्यांच्यावर आरोप निश्चित झाल्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ उतरले आहेत. यातून लक्षात येते की, रिपब्लिकन पार्टीच्या मतदारांना अन्य पर्यायाबाबत मन वळवणे किती ठरू शकते हे सिद्ध होणार आहे.

ट्रम्प यांच्यावर फसवणुकीसह २४ मुद्द्यांवर आरोप निश्चित ट्रम्प यांच्यावरील आराेप सीलबंद आहेत. मात्र, सूत्रांनी सांगितले की, गंभीर फौजदारी कलमांसह २ डझन मुद्द्यांवर आरोप निश्चित झाले. प्रसारमाध्यमातील वृत्तानुसार, ट्रम्प फसवणूक आदीशी संबंधित ३० आरोपांचा सामना करत आहेत. ट्रम्प यांचे वकील जो टेकोपीना यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी सर्व आरोपपत्रे पाहिली नाहीत.