आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Lockdown Returns In France, Germany; Irresponsibility Surrounds The European Countries In The Corona

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुसरी लाट:फ्रान्स, जर्मनीत लॉकडाऊन रिटर्न; कोरोनाच्या विळख्यातील युरोपीय देशांना बेजबाबदारपणा भोवतोय

पॅरिस/ बर्लिनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जर्मनीत रेस्तराँ, बार, जिम-थिएटर बंद करण्याचे आदेश, दक्षतेसाठी उपाय

काेराेनाच्या दुसऱ्या लाटेमुळे फ्रान्स व जर्मनीने राष्ट्रीय पातळीवर लाॅकडाऊनची घाेषणा केली आहे. फ्रान्समध्ये शुक्रवारी तर जर्मनीत साेमवारपासून लाॅकडाऊन लागू हाेणार आहे. दाेन्ही देश युराेपातील सर्वात माेठी अर्थव्यवस्था आहेत. फ्रान्समध्ये आराेग्यासारख्या आणीबाणीच्या स्थितीमध्येच घराबाहेर पडण्याची परवानगी देण्यात आली. येथे बुधवारी सर्वाधिक ३६ हजार ४३७ रुग्ण आढळून आले. एप्रिलनंतर एका दिवसात सर्वाधिक २४४ जणांचा मृत्यूही झाला आहे. फ्रान्समध्ये आतापर्यंत १२ लाख ३५ हजार १३२ रुग्ण आढळून आले आहेत. ३५ हजार ७८५ जणांचा मृत्यू झाला आहे. राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्राॅन म्हणाले, दुसरी लाट जास्त धाेकादायक असेल. जर्मनीने लाॅकडाऊनअंतर्गत रेस्तराँ, बार, जिम, थिएटर बंद करण्याचे आदेश दिले आहे. चान्सलर अँगेला मर्केल म्हणाल्या, परिस्थिती अतिशय गंभीर आहे. जर्मनीत ४,७९,६२१ रुग्ण आढळले. १० हजार ३५९ जणांचा मृत्यू झाला. बुधवारी येथे सर्वाधिक १६ हजार २०२ रुग्ण आढळले. जानेवारीत काेराेनाच्या पहिल्या लाटेने युराेपीय देशांत परिस्थिती गंभीर बनवली हाेती. ब्रिटन, इटली, स्पेन, फ्रान्समध्ये अशी स्थिती हाेती. या देशांनी लाॅकडाऊन लागू केला. जून-जुलैमध्ये स्थिती सुधारल्यानंतर अनलाॅक केले. परंतु नियमांबद्दल लाेक गंभीर नव्हते. म्हणूनच युराेप खंडात ९२,०७,४२५ रुग्ण आढळून आले. २ लाख ५८ हजार ६६२ मृत्यू झाले.

दुर्लक्षाचा परिणाम : झेक रिपब्लिक, पाेलंड पहिल्या लाटेपासून वाचले
युराेपात झेक रिपब्लिक, पाेलंडला काेराेनाच्या पहिल्या लाटेचा फारसा फटका बसला नव्हता. मात्र दुसऱ्या लाटेत दाेन्ही देशांना तडाखा बसला आहे. मास्क, डिस्टन्सिंगचे पालन करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. झेक रिपब्लिकमध्ये आतापर्यंत २ लाख ९७ हजार १३ रुग्ण आढळून आले, तर २ हजार ६७५ जणांचा मृत्यू झाला. मंगळवारी सर्वाधिक १५ हजार ६६३ रुग्ण आढळून आले. पाेलंडमध्ये आतापर्यंत ३ लाख १९ हजार २०५ रुग्ण आढळून आले. येथे ५ हजार १४९ मृत्यू झाले. पाेलंडमध्ये बुधवारी सर्वाधिक १८ हजार ८२० रुग्ण आढळून आले हाेते.

ब्रिटनमध्ये दरराेज ९६ हजार रुग्ण आढळताहेत : दावा
इम्पीरियल काॅलेज आॅफ लंडनच्या संशाेधकांनी एका अभ्यासाच्या आधारे एक दावा केला आहे. ब्रिटनमध्ये दरराेज काेराेनाचे ९६ हजारांवर रुग्ण आढळून येत आहेत. दर ९ दिवसांत रुग्णसंख्येत दुपटीने वाढ हाेत आहे. यासंबंधी अभ्यास प्रकल्पावर ब्रिटनच्या आराेग्य विभागाने निधीही दिला हाेता. प्रकल्पातील सदस्य स्टीव्हन रिले म्हणाले, नाताळपूर्वी नियमांची कडक अंमलबजावणी करावी, अन्यथा धाेका वाढू शकताे. सरकारने किमान प्रांतीय पातळीवर लाॅकडाऊन करायला हवे.