आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंयुक्त राष्ट्राच्या अन्न आणि कृषी संघटनेने(एफएओ) अफगाणिस्तानच्या गहू उत्पादक उत्तर आणि ईशान्य क्षेत्रातील ८ राज्यांत मोठ्या प्रमाणावर मोरक्कोच्या टोळ किटकांबाबत इशारा जारी केला आहे. हेरात आणि घोर प्रांतातून ताजा अहवाल आल्यानंतर बदख्शां, बादगीस, बागलान, बल्ख, कुंदुज, समांगन, सर-ए-पुल आणि तखरमध्ये टोळधाड दिसल्याची माहिती मिळाली आहे.
अफगाणिस्तानमध्ये एफएओ प्रतिनिधी रिचर्ड ट्रेंकार्ड म्हणाले की, हे टोळ रोपट्यांच्या १५० हून अधिक प्रजाती खातात.यात अफगाणिस्तानात उगवणारी विविध रोपटी, गवत आणि ५० हून अधिक पीकांचा समावेश आहे. या वर्षी अफगाणिस्तानमध्ये पीकाचा पूर्वानुमान चांगला आहे. गेल्या ३ वर्षांत एवढे चांगले पीक पाहायला मिळाले नव्हते. अशात होणारी टोळधाड नुकसान करू शकते.
एफएओनुसार, टोळधाडीमुळे या वर्षी गव्हाचे १२ लाख मे.टन पीक नष्ट होऊ शकते. हे अफगाणिस्तानमध्ये गव्हाच्या एकूण वार्षिक उत्पन्नाच्या सुमारे २५% आहे. यामुळे अफगाणिस्तानला ४८ कोटी डॉलरपर्यंत(सुमारे ३९४३ कोटी रु.) नुकसान होऊ शकते. अफगाणिस्तानमध्ये याआधी २०१३ आणि १९८३ मध्ये टोळधाड आली होती. या दोन्ही वर्षांमध्ये गव्हाच्या पीकाच्या वार्षिक उत्पादनात २५% पर्यंत हिस्सा नष्ट झाला होता,असे सांगण्यात येते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.