आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लाॅकडाऊन:टाइमपाससाठी घराच्या भिंतीला पाडले भगदाड, तर सापडले 120 वर्षे जुने भुयार

लंडनएका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • तीन मीटर रुंद भुयारात सापडले पेंटचे डबे, वृत्तपत्रे व जुनी सायकल

लाॅकडाऊन काळात काही लोक वेळ घालविण्यासाठी पेंटिंग करतात, काही नवे पदार्थ तयार करण्याचे शिकतात, काही आपली जुनी आवड जोपासण्याचा प्रयत्न करतात. पण ब्रिटनमध्ये एका व्यक्तीने फावल्या वेळात घरात दडलेले एक भुयार शोधून काढले आहे. 

डेवन कौंटीमध्ये प्लायमाऊथ येथे राहणारे जॅक ब्राऊन यांनी काही दिवसापूर्वी हे घर विकत घेतले होते.  जॅक घरात एकटेच बसून कंटाळले होते. त्यांनी टाइमपास म्हणून घरातील भिंत फोडण्यास सुरुवात केली. तेव्हा त्यांना या गोष्टीची थोडीशीही कल्पना नव्हती की, खूप वर्षांपासून रहस्यमय बनलेली जागा आपल्याला सापडेल. त्यांना ही भिंत इतर भिंतींपेक्षा काहीशी वेगळी वाटत होती. त्यामुळे या भिंतीची रचना अशी वेगळी का आहे हे त्यांना पाहायचे होते. त्यामुळे घरातील ही भिंत पाडण्याविषयी त्यांच्या मनात कुतूहल निर्माण झाले होते. 

तीन मीटर रुंद भुयारात सापडले पेंटचे डबे, वृत्तपत्रे व जुनी सायकल

   एका ड्रिलिंग मशीनच्या मदतीने भिंतीला आधी छोटे छिद्र पाडले. नंतर  टॉर्चच्या उजेडात पलीकडे डोकावून पाहण्याचा प्रयत्न केला. नंतर आतील दृश्य पाहून त्यांना धक्काच बसला. टॉर्चचा उजेड खूप दूरवर जात होता. त्यामुळे त्यांनी आणखी उत्सुकतेपोटी भिंत पाडण्यास सुरुवात केली. ड्रिलिंग मशीनने त्यांनी आणखी मोठे भगदाड पाडले. त्यातून ते पलीकडे गेले. तेथील दृश्य पाहून त्यांना खूप आश्चर्य वाटले. आत खूप मोठी मोकळी जागा होती. हे ठिकाण खूप वर्षांपासून बंदच होते, असे जाणवले. ही जागा म्हणजे एक भुयार होते. नंतर त्यांनी याचा शोध घेतला. तेव्हा समजले की,हे भुयार गेल्या १२० वर्षांपासून बंद होते. जॅक यांनी सांगितले,हे भुयार पाच मीटर लांब व तीन मीटर रुंद होती. याची उंचीही तितकीच होती. येथे काही जुनी वृत्तपत्रे सापडली. त्यावरून  हे भुयार गेल्या ५० वर्षांपासून बंद होते, असे दिसले. 

या भुयाराचा वापर  जुने पंेटचे डब्बे व बांधकामाचे काही साहित्य ठेवण्यासाठी करण्यात येत होता. जॅक यांना या भुयारात एक जुनी सायकलही ठेवलेली दिसली. यासंदर्भात त्यांनी एका इतिहास तज्ञांशी चर्चा केली. त्यांनी दिलेली माहिती अशी की, प्लायमाऊथमधील हा भाग विंडरिज हिल नावाने ओळखला जात होता. तेव्हा बहुतांश घरांची रचना अशा प्रकारे केली जात होती. हे भुयार अशाच प्रकारे तयार करण्यात आले असावे, असे इतिहास तज्ज्ञांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...