आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • London Divorce Case | Fought The Suit For 2 Years For The Property, Paid A Fee Of Rs 6 Crore; Got A Divorce But Went Home, Got A Debt Of Rs 1.5 Crore

दिव्य मराठी विशेष:संपत्तीसाठी 2 वर्षे खटला लढले, 6 कोटी रुपये फी दिली; घटस्फोट मिळाला पण घर गेले, दीड कोटीचे कर्जही झाले

लंडन2 महिन्यांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • लग्नाच्या 22 वर्षांनंतर घटस्फोट, जज म्हणाले- हा खटला दांपत्यांसाठी इशारा
  • भागीदारीतला व्यवसाय बंद, दोघांकडे उरले 5-5 लाख रुपये

ही घटना लंडनमधील आहे. पती-पत्नीचे आयुष्य सुखात सुरू होते. तीन मुलेही झाली. सर्वकाही सुरळीत सुरू असताना २२ वर्षांनंतर दोघांमध्ये कटुता निर्माण झाली. गोष्ट थेट घटस्फोटापर्यंत पोहोचली. नवरा-बायकोने कोर्ट गाठले. संपत्तीचा जास्त हिस्सा मिळवण्यासाठी दोघेही युक्तिवाद करत होते. खटला २ वर्षे चालला. एवढेच काय तर घरही विकले गेले. कमावलेली सर्व संपत्ती वकिलांच्या फीमध्ये खर्च झाली. डेबिट कार्डचे कर्ज फेडणेही बाकीच आहे. शुक्रवारी खटल्याच्या निकालानंतर दोघांच्याही वाट्याला केवळ ५-५ लाख रुपये रोख शिल्लक होते.

या घटनेतील नवरा-बायकोची ओळख उघड केलेली नाही. ५३ वर्षीय पती व ५० वर्षीय पत्नी केअर होमचे मालक होते. पाच बेडरूमचे घर होते. मुलांना सुटीत फिरण्यासही घेऊन जायचे. दर्जेदार शिक्षणासाठी पुरेसा खर्च करायचे. दोघांकडे १४ लाख रुपयांची मर्सिडीझ कार होती. पती-पत्नी विभक्त झाल्यानंतर केअर होमही बंद झाले. पतीवर बेरोजगारी ओढवली. त्यामुळे त्याने पाइप कंपनीत नोकरी सुरू केली. त्याच्यावर डेबिट कार्डचे १.१७ कोटीचे कर्ज झाले आहे. सुमारे ६ कोटी रुपये वकिलांची फी आणि कायदेशीर प्रक्रियेत खर्च झाले. न्यायालयात १३ दिवस सुनावणी झाली. पतीने चार वेळा कोर्ट व हायकोर्टात अपील केले. मात्र ते फेटाळले गेले. हायकोर्टाचे न्यायमूर्ती रॉबर्ट पिल म्हणाले, घर विकल्यानंतर ६.०४ कोटी रुपये मिळाले. मात्र फीचा खर्च दिल्यानंतर भाड्याच्या घरात राहणाऱ्या पतीला कर्जही फेडायचे आहे. हे अत्यंत दुःखद आहे.

जज म्हणाले : आत्मघाती खटल्याची अखेर झाली सांगता

न्यायमूर्ती पिल म्हणाले, या अवाजवी खर्चावर विश्वास ठेवणे कठीण आहे. मात्र हे सत्य आहे. अशी आणखी प्रकरणे असू शकतात, मात्र एवढी वाईट नाहीत. हा अशा दांपत्यांसाठी इशारा आहे, जे न्यायालयीन प्रक्रियेत खर्च करतात आणि कफल्लक होतात. हा खटला एक प्रकारचा आत्मघाती खटला आहे. तो आता संपला आहे. यांनी कमाईपेक्षा जास्त खर्च केले व कर्जबाजारी झाले.     

0