आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लंडनमधून चोरीला गेलेली बेंटले कार पाकिस्तानात:नोंदणी आणि नंबर प्लेट बदलण्यात यश आले, चेसिस नंबर उघड

24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडनमधून चोरीला गेलेली आलिशान बेंटले मुल्सेन सेडान कार पाकिस्तानमधील कराचीमध्ये सापडली आहे. 2 सप्टेंबर रोजी कराची येथील एका पॉश बंगल्यातून कस्टम एन्फोर्समेंटने (सीसीई) कार जप्त केली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यूकेच्या नॅशनल क्राइम एजन्सीने (एनसीए) पाकिस्तानी अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली होती. यानंतर छापा टाकण्यात आला. ही कार काही आठवड्यांपूर्वी लंडनमधून चोरीला गेली होती. ही कार ब्रिटनमधील काही लोकांनी पाकिस्तानी जमील शफीला विकली होती. दलालालाही अटक करण्यात आली. त्याची किंमत सुमारे 3.22 कोटींहून अधिक आहे.

पाकिस्तानी मीडियाच्या वृत्तानुसार, चोरटे बेंटलेमधील ट्रेसिंग ट्रॅकर बंद करू शकले नाहीत. यामुळे यूके अधिकाऱ्यांना मदत झाली आणि त्यांनी प्रगत ट्रेसिंग सिस्टमद्वारे कारचे लोकेशन ट्रेस केले आणि पाकिस्तानी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला.

कागदपत्रे आणि नोंदणी बनावट
अधिकाऱ्यांनी सांगितले की, चोर इतके हुशार होते की त्यांनी कारची पाकिस्तानात नोंदणी करून तिची नंबर प्लेट बदलली. परंतु कारचा चेसीस क्रमांक ब्रिटनच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या क्रमांकासारखाच असल्याचे तपासादरम्यान अधिकाऱ्यांना आढळून आले.

रॅकेटच्या सूत्रधाराचा शोध सुरू
त्याच्याकडून कारची कागदपत्रेही मागितली असता त्याच्याकडून बनावट कागदपत्रे सापडली. अशाप्रकारे चोरीच्या कारचा पोलखोल झाला. या रॅकेटमध्ये सामील असलेल्या लोकांनी पूर्व युरोपीय देशाच्या राजनयिकाच्या कागदपत्रांचा वापर करून कार पाकिस्तानात नेली होती. त्याचबरोबर या रॅकेटच्या सूत्रधाराचा पोलिस शोध घेत आहेत.

बातम्या आणखी आहेत...