आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लंडनच्या युनियन स्टेशनजवळ आग:अनेक रेल्वे थांबवण्यात आल्या, अग्निशमन दलाच्या 70 गाड्या घटनास्थळी

लंडन3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडनमधील सदर्क येथील युनियन स्ट्रीट रेल्वे स्टेशनजवळ आग लागली. बुधवारी सकाळी 9.20 वाजता (भारतीय वेळेनुसार दुपारी 1.50 च्या सुमारास) रेल्वेच्या कमानीखाली आग लागली. ही आग पार्किंग एरियातून स्थानकापर्यंत पसरली. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी 70 हून अधिक अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या आहेत.

लंडन अग्निशमन दलाने सांगितले की, आग पसरण्यापासून रोखण्यात आली असली तरी ती पूर्णपणे विझवता आली नाहीये. आगीमुळे चार रेल्वे मार्ग बंद करण्यात आले असून 70 रेल्वेचे मार्ग बदलण्यात आले आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव आजूबाजूच्या इमारती रिकाम्या करण्यात आल्या आहेत. आगीचा धूर आजूबाजूच्या परिसरात पसरला आहे.

अनेक किलोमीटर परिसरात धुराचे लोट
नेटवर्क रेलने वृत्त दिले की, ही आग एका कार पार्किंगमध्ये पसरली आणि दोन इलेक्ट्रिक कार आगीमध्ये आल्या. धोका लक्षात घेता स्टेशनजवळील अनेक कॅफे आणि रेस्तरॉं बंद करण्यात आले आहेत. या आगीमुळे स्थानकाच्या कमानीचेही मोठे नुकसान झाले आहे.

धूर पाहून ट्रेन चालकाने आगीची माहिती दिली
नेटवर्क रेलच्या माहितीनुसार, एका ट्रेन ड्रायव्हरने सर्वात पहिले आगीचा धूर पहिला. लंडन ब्रिज आणि वॉटरलू पूर्व दरम्यानच्या रेल्वे मार्गावर धूर दिसल्यानंतर चालकाने स्टेशनवर याची माहिती दिली. लंडन अग्निशमन दलाला (LFB) बुधवारी सकाळी ९.२९ वाजता (भारतीय वेळेनुसार दुपारी २ वाजता) या घटनेची माहिती मिळाली.

एलएफबीच्या म्हणण्यानुसार, रुळाखालील संपूर्ण रेल्वे कमानीला आग लागली होती आणि अनेक किलोमीटर दूरून धूर दिसत होता. अग्निशमन दलाने सांगितले की, सकाळी 11:20 वाजता (भारतीय वेळेनुसार 3:50) आग पसरण्यापासून रोखण्यात आली. आता ती विझवण्याचे काम सुरू आहे. लोकांना धुरापासून दूर राहण्यासाठी घराच्या खिडक्या आणि दरवाजे बंद ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...