आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराफ्रान्समध्ये प्रत्येकी चारपैकी एका वयस्कराला श्रवणात अडचणी जाणवू लागल्या आहेत. फ्रान्समधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ अँड मेडिकल रिसर्च इंसर्मच्या एका नव्या अध्ययनात ही बाब समोर आली आहे. हा वयोगट हळूहळू बहिरेपणा अनुभवू लागला आहे. म्हणजेच फ्रान्समधील २५ टक्के लोकसंख्येत बहिरेपणाची लक्षणे दिसू लागली आहेत. फ्रान्समध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारचे संशोधन व्यापक पातळीवर करण्यात आले आहे. त्यात १८ ते ७५ वयोगटातील १ लाख ८६ हजार ४६० जणांचा समावेश होता.
पूर्वी या विषयातील लहान स्वरूपातील संशोधन झाले होते. लोकांमध्ये अशा प्रकारची व्याधी निर्माण होण्यामागे जीवनशैली, सोशल आयसोलेशन, नैराश्य व ध्वनिप्रदूषण ही कारणे सांगितली जातात. संशोधकांनी ही समस्या दोन गटांत विभागली आहे. त्यात वृद्ध, पुरुष, बीएमआय असलेल्या लोकांमध्ये श्रवणाची समस्या दिसते. त्यातही मधुमेह, नैराश्यग्रस्त लोक त्यामुळे ग्रस्त असल्याचे सांगण्यात आले.
चांगले उत्पन्न असलेल्या, शहरात एकटे राहणाऱ्यांना हेडफोनचा अतिवापर केल्याने अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यापैकी ४ टक्के लोकांची श्रवणशक्ती बंद झाली. जागतिक आरोग्य संस्थेच्या म्हणण्यानुसार जगभरातील सुमारे १५० कोटी लोक कोणत्या ना कोणत्या कारणामुळे अशा समस्यांना तोंड देत आहेत. २०५० पर्यंत ही संख्या २५० कोटी होण्याची शक्यता आहे. म्हणूनच त्याकडे सार्वजनिक आरोग्याची प्रमुख समस्या म्हणून पाहिले जात आहे.
फ्रान्समध्ये ३७ टक्के लोकांकडून श्रवणयंत्रांचा वापर
फ्रान्समध्ये केवळ ३७ टक्के लोक श्रवणयंत्रांचा वापर करतात. धूम्रपान करणारे आणि उच्च बीएमआय असलेले लोकही हिअरिंगचा कमी वापर करतात. फ्रान्सच्या आरोग्य विभागाने श्रवणयंत्रांचे मोफत वाटप केले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.