आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या काही वर्षांत जगभरामध्ये कट्टरता वाढली आहे. कोरोनानंतरच्या वर्षांमध्ये ती अधिक वाढली. एकटेपणा हे यामागील एक मोठे कारण आहे. दीर्घकाळ एकटेपणाचा सामना करणाऱ्या व्यक्तीला असुरक्षित असल्याची जाणीव व्हायला लागते. ही भावना इतकी खोलवर रुजते की, व्यक्तीला सुरक्षेची काळजी वाटायला लागते. शिकागो विद्यापीठातील सोशल न्यूरोसायंटिस्ट जॉन कॅसियोप्पो यांनी एकटेपणाच्या परिणामांवर संशोधन केले. ते सांगतात, कोणत्याही प्रकारचा धोका नसतानाही दीर्घकाळ एकटे राहिल्याने व्यक्तीचा मेंदू शरीराला धोक्याचे सिग्नल पाठवायला लागतो. शरीर तणाव वाढवणारे हार्मोन सोडायला लागते. झोप येत नाही व बीपीचा त्रास होतो. एकटेपणामुळे माणसाचा मृत्यू लवकर होऊ शकतो, असे काही संशोधनांतून आढळले आहे. दीर्घकाळ एकटे राहणाऱ्या व्यक्तीला इतरांची साथ आवडत नसल्याचे डॉ. कॅसियोप्पो यांना संशोधनात आढळले.
ब्रिटिश जर्नल ऑफ सायकोलॉजीमध्ये प्रसिद्ध झालेल्या २०२१ च्या एका संशोधन अहवालानुसार, लोक पैसे कमावण्यासाठी एकमेकांशी इतकी स्पर्धा करत आहेत की, ते सामाजिक वर्तुळही तयार करू शकत नाहीत. टॉपवर पोहोचलेले लोक आपले स्टेटस कायम ठेवण्यासाठी इतके काम आणि संघर्ष करत आहेत की, ते बिगर-सामाजिक होत चालले आहेत. संशोधनानुसार, नवउदारमतवाद लोकांमध्ये एक प्रकारचे सामाजिक वेगळेपण, स्पर्धा आणि एकटेपणाला प्रोत्साहित करत आला आहे. तत्त्वज्ञानी हनाह अरेंत यांनी या स्थितीला ‘अपरूटेडनेस’ म्हणजेच ‘आपल्या मुळापासून उखडणे’ म्हटले आहे. यात व्यक्ती समाजापासून दूर जाते आणि ती स्वत: आपल्या विचारांपासून वेगळी होते. असे लोक कट्टर होतात. ते कोणत्याही कट्टर विचारधारेपासून सहजपणे प्रेरित होतात. ज्यांची सामाजिक बांधिलकी कमी असते ते कट्टर विचारधारेच्या पक्षांना मते देतात, असे पॉलिटिकल सायकोलॉजीमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनातून आढळले आहे.
सोशल मीडिया अन् वाढती उष्णताही माणसाला कट्टर बनवते उष्णता वाढल्याने लोकांचा राग वाढतो व ते सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला राग काढत असल्याचे एका संशोधनातून आढळले आहे. कट्टरतेला चालना देण्यात सोशल मीडियाची भूमिका मोठी राहिली आहे. विचारप्रणालीच्या पातळीवर असो किंवा धर्माच्या, यामुळे लोक स्पष्टपणे एकमेकांशी वेगळे झाले आहेत. पसंत आणि नापसंत असलेल्या लोकांच्या वेगवेगळ्या समूहांमध्ये एकमेकांपेक्षा जास्त कट्टर होण्याची जणू स्पर्धाच लागते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.