आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभ्यास:दीर्घ नियोजनामुळे प्रवासाचा आनंद कमी होतो; 67%अमेरिकी लोकांना अचानक प्रवासातून मिळतो आनंद

वृत्तसंस्था| वॉशिंग्टन20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बऱ्याचदा दीर्घ नियोजन आणि जास्त चिकित्सा केल्यामुळे प्रवासाचा आनंद कमी होतो. प्रत्यक्षात तीनपैकी दोन अमेरिकींना वाटते की, जास्त नियोजनाशिवाय केलेला प्रवास जास्त आनंददायक असतो. नुकत्याच केलेल्या वन पोल सर्व्हेमध्ये ही बाब समोर आली की, ६७% अमेरिकींना अचानक झालेला प्रवास जास्त उल्हासित करतो. सर्वेक्षणानुसार, २२% एकट्याने प्रवास करणे पसंत करतात.

एखाद्या आश्चर्यचकीत ठिकाणी जाणे ७३% लोकांना चांगले वाटते. ७५% ना वाटते की, फिरायला कुठेही जा प्रवास आनंददायक झाला पाहिजे. लोकांना प्रश्न विचारला की, एकटे किंवा मित्रांसोबत प्रवास करणे आवडते का, त्यावर ७८% प्रवाशांनी एकटे प्रवास करत नसल्याचे म्हटले आहे. लोक वीकेंड ट्रॅव्हलिंग टाळून ऑफ सीझन प्रवास करणे जास्त पसंत करतात. प्रवासासाठी आर्थिक नियोजनही आवश्यक आहे. एवढेच नव्हे तर रस्त्यावर खरेदी करण्याऐवजी स्वत:चे स्नॅक घेऊन ३२% लोक पैसे वाचवतात. पर्यटक आता हॉट-स्पॉटमध्ये जाणे टाळतात. ४४% पेक्षा जास्त लोकांनी या वर्षी आपल्या प्रवासाच्या अनुभवात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तर देणाऱ्यांपैकी ५७% नव्या ठिकाणी जाणारे आहेत.

दुासरीकडे,३४% एकाच प्रवासात एकापेक्षा जास्त ठिकाणी जाण्याची योजना आयात आहेत. ४३% टूर्स आणि डायनिंग आऊटसारख्या अनुभवांवर मोठा खर्च करण्याची योजना आखत आहेत. ५३% मित्रांसाठी, ५०% विश्रांतीसाठी प्रवास करतात

कुटुंब व मित्रांकडे जाण्याची इच्छा ५३%, काहीशा विश्रांतीची गरज म्हणून ५०% आणि नव्या शहराच्या शोधातून ३५% लोक प्रवास करतात. ७०% अमेरिकी आपल्या शहरातून तीन तासांहून जास्तीच्या प्रवासाची योजना आखत आहेत.