आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोना विषाणू संसर्गात चीनला फळ विक्री करणे सोपे नाही. चीनने विषाणूला सीमेबाहेर ठेवण्यासाठी खूप मोठे उपाय योजले. त्यांनी फळे आणि फ्रोजन फूडच्या हजारो पॅकेटच्या तपासणीसोबत बाहेरून आलेल्या टपालावर कठोर निगराणी ठेवली आहे. अशा उत्पादनातून विषाणू संसर्ग होत नाही हे सिद्ध होऊनही अशी स्थिती आहे. या धोरणामुळे काही दक्षिण आशियाई देशांच्या शेतकऱ्यांवर वाईट परिणाम झाला आहे. २०२० मध्ये द. पूर्व आशियातून चीनला जवळपास ४५ हजार कोटी रुपयांच्या फळांची निर्यात झाली होती.
चीनच्या सीमांवर व्हिएतनाम, म्यानमार, थायलंड आणि लाओसहून येणाऱ्या ट्रकांची लांब रांग आहे. चीनला बहुतांश फळे पाठवणाऱ्या व्हिएतनामचे ड्रॅगन फ्रूट उत्पादक शेतकऱ्यांवर मोठे कर्ज झाले आहे. ट्रकचालकांना चीनमध्ये माल नेण्याआधी १५ दिवस क्वॉरंटाइन राहावे लागते. त्यामुळे म्यानमारमध्ये टरबुजाचे निर्यातदार आपला माल सीमेवर फेकत आहेत. व्हिएतनामच्या ड्रॅगन फ्रूट उत्पादक शेतकऱ्यांवर निर्बंधांमुळे सर्वात जास्त परिणाम झाला आहे.
चीनमधील नऊ शहरांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, व्हिएतनामहून आलेल्या ड्रॅगन फ्रूटमध्ये कोरोना विषाणू आढळले आहेत. त्यानंतर अधिकाऱ्यांनी फळ विक्री करणारे सुपरमार्केट्स बंद केले. फळांच्या संपर्कात आलेल्या एक हजाराहून अधिक लोकांना क्वाॅरंटाइनमध्ये ठेवले. म्यानमारचे टरबूज उत्पादक शेतकरी म्यो की यांनी सांगितले की, आम्हाला फळे फेकावी लागली. माल चीनच्या सीमेवर ६० दिवसांपर्यंत अडकला आणि सडला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.