आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासेवानिवृत्तीचे वय वाढवावे की नाही, यावरून जगभरात वाद सुरू आहेत. फ्रान्समध्ये नुकतेच निवृत्तीचे वय दोन वर्षांनी वाढवल्याच्या विरोधात आंदोलन झाले होते. अनेक राज्यांत होणाऱ्या निवडणुकीतही हा प्रमुख मुद्दा आहे. धोरणकर्त्यांनुसार, धोरणे तयार केली होती तेव्हा आयुर्मान कमी होते. गेल्या काही दशकांमध्ये यात वाढ झाली आहे. म्हणून निवृत्तीचे वयही बदलले पाहिजे. अमेरिकेत सरासरी आयुर्मान १६ वर्षांनी वाढले आहे. येथे ते ७६ वर्षे मानले आहे. अनेक देशांत ते ८२ वर्षांपर्यंत आहे.
आरोग्य विषयाचे तज्ज्ञ म्हणतात, आयुर्मानाऐवजी आरोग्याच्या बाबतीत वयासोबत होणारे बदल बघितले पाहिजेत. म्हणजे जितकी वर्षे लोक निरोगी असतात तितक्या वर्षांना सक्रिय आयुष्य जगण्यालायक वय मानले पाहिजे. बोस्टन कॉलेजमधील सेंटर फॉर रिटायरमेंट रिसर्चचे सीनियर रिसर्च इकोनॉमिस्ट गॅल वेटस्टीन यांनी कार्यरत आयुर्मानावर संशोधन केले. यात जे अमेरिकन ५० वर्षे वयामध्ये निरोगी आहेत ते २३ वर्षे आणखी निरोगी राहून काम करण्याची अपेक्षा बाळगतात, असे आढळले. या हिशेबाने सरासरी कार्यरत आयुर्मान ७३ वर्षे झाले. डॉ. वेटस्टीन म्हणतात, ‘आयुर्मानासोबत काम करण्याची क्षमताही वाढली आहे. २०२० मध्ये सुमारे ४५% अमेरिकन हे वर्कफोर्स मॅनेजमेंट, बिझनेस, वित्त, शिक्षण व आरोग्यासारख्या ज्ञानाधारित क्षेत्रात होते. १९३५ मध्ये अशा प्रकारच्या व्यवसायांत मनुष्यबळाचा केवळ ६% वाटा होता. दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठाचे जेरेंटोलॉजी एक्सपर्ट डॉ. पिंचस कोहेन म्हणतात, आरोग्याच्या दृष्टीने या क्षेत्रांत ६५ वर्षांपेक्षा कमी वयातील निवृत्तीला कोणताच अर्थ नाही. केवळ शारीरिक श्रम असलेल्या क्षेत्रांमध्ये ते योग्य ठरवले जाऊ शकते.
जॉर्जिया विद्यापीठातील जेरेंटोलॉजी इन्स्टिट्यूटच्या संचालिका लीजा रेंजी हेमंड सांगतात, ‘ज्ञानाधारित क्षेत्रांत ७० वर्षे वयामध्ये निवृत्ती ही संज्ञानात्मक दृष्टिनेही योग्य आहे. आपली बौद्धिक क्षमता ७० वर्षे वयातही आपल्याला चांगले ठेवण्यात सक्षम आहे. निवृत्तीचे वय कर्मचाऱ्यांच्या क्षमतांवर आधारित असेल तर ६० वर्षे वयात निवृत्ती पत्करण्याचे कोणतेच कारण नाही. कामकाज, ध्यान व स्मृतीसाठी महत्त्वाच्या मेंदूच्या प्रीफ्रंटल कॉर्टेक्सची क्षमता ४५ वर्षे वयात कमी होत जाते, पण उर्वरित भाग या नुकसानाची भरपाई करतात. म्हणजे हे शास्त्रीयदृष्ट्याही योग्य आहे.’
मानसिक अन् शारीरिक आरोग्यावरही होतो सेवानिवृत्तीचा परिणाम : तज्ज्ञ
डॉ. हेमंड म्हणतात, ‘कर्मचाऱ्यांमध्ये राहून बऱ्याच बौद्धिक प्रक्रिया राखल्या जातात आणि मजबूत केल्या जातात. त्यामुळे काही लोक काम करणे बंद करतात तेव्हा त्यांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य बिघडते. एका संशोधनानुसार, उशिराने सेवानिवृत्ती ही मृत्यूची जोखिीम कमी होण्याशीही संबंधित आहे.’ तज्ज्ञांच्या मते, ‘नोकरीशी संबंधित शारीरिक हालचाल थांबणे व सामाजिक संपर्क कमी होणे हे निवृत्तीनंतर होणाऱ्या घसरणीची मोठी कारणे आहेत.’
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.