आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिकेतील लॉस एंजलिस राज्यात या वर्षी पहिल्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या मुलांना सरकारकडून विशेष भेट मिळाली. ही भेट त्यांचा शैक्षणिक प्रवास अडथळारहित सुरू राहण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. पहिलीच्या वर्गातील सर्व मुलांना फ्री कॉलेज सेव्हिंग अकाउंट प्रोग्रामशी जोडण्यात आले आहे. सुमारे ४४ हजार मुलांची बचत खाती उघडून प्रत्येक खात्यात ३८०० रुपये जमा करण्यात आले. असे म्हटले जाते की, अमेरिकेत ही सर्वात मोठी कॉलेज सेव्हिंग योजना आहे. या योजनेचा उद्देश म्हणजे पैशाच्या कमतरतेमुळे मुलांच्या पुढील शिक्षणात कोणताही अडथळा येऊ नये. मुले या पैशाचा वापर एखादा कोर्स, चाचणी किंवा शिक्षणाशी निगडित कामांसाठी करू शकतील. विशेषत: दोन किंवा चार वर्षांच्या कोर्सचे शुल्क याद्वारे दिले जाऊ शकेल.
गरीब विद्यार्थ्यांसाठी ही योजना एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही. कारण आईवडिलांच्या खराब क्रेडिट स्कोरमुळे अनेकदा त्यांना बँका शैक्षणिक कर्ज देण्यास टाळाटाळ करतात. या योजनेचा दुसरा लाभ म्हणजे कुटुंबातील सदस्यही यात गुंतवणूक करू शकतात. जर आईवडील यात योगदान देत असतील तर सरकारही दरवर्षी २००० रुपयांची रक्कम त्यात आपल्याकडून जमा करेल. जर विद्यार्थी आणि त्याचे कुटुंबीय राज्य सोडून गेले तर ही रक्कम जप्त करून कुटुंबाचे योगदान त्यांना परत केले जाईल. आईवडिलांची इच्छा नसेल तर ते योजनेला नकारही देऊ शकतात. परंतु तज्ज्ञांच्या मते असे कदाचितच होईल. असा पुढाकार इतर राज्यांतही खूप यशस्वी ठरला आहे. ओक्लोहोमामध्ये निवड झालेल्या मुलांना शाळा प्रवेश घेतल्यावर सुमारे ७६०० रुपये कॉलेज सेव्हिंग योजनेत दिले जात आहेत. ज्या कुटुंबीयांना यात सहभाग मिळाला त्यांची मुलांना महाविद्यालयीन शिक्षणासाठी मोलाची मदत झाली आहे. सरकारद्वारे करण्यात आलेल्या एका अभ्यासात हे स्पष्ट झाले की, कमकुवत स्तरातील मुलांच्या खात्यात योग्य रक्कम राहिल्यास त्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण होण्याची शक्यता अधिक असते. अशा प्रकारच्या योजनांची सुरुवात सॅनफ्रॅन्सिकोने २०११ मध्ये केली होती. तेव्हापासून अनेक राज्यांत या योजना राबवत असून शंभर टक्के विद्यार्थ्यांचे नामांकन भरून घेत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.