आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Loud, Loud Snoring During The Day Can Increase The Risk Of Glaucoma By 11 Percent, As Well As The Risk Of Vision Loss.

11 वर्षांचे संशाेधन:दिवसा झाेपणे, मोठ्या आवाजात घाेरण्याने ग्लुकाेमाचा धाेका 11 टक्के वाढू शकतो, दृष्टी जाण्याचाही धाेका

औरंगाबाद24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रात्री पुरेशी झाेप न घेणे, दिवसा झाेप येणे किंवा घाेरणे याचा डाेळ्यांच्या आराेग्यावर वाईट परिणाम हाेऊ शकताे. दीर्घकाळ ही समस्या राहिल्यास ग्लुकाेमा (माेतीबिंदू) हाेण्याचा धाेका वाढताे. वेळेवर उपचार न मिळाल्यास दृष्टी गमावण्याचीदेखील शक्यता असते. ग्लुकाेमामुळे दृष्टी गेल्यानंतर ती पुन्हा येत नाही. पुरेशी झाेप घेत नसल्यास हा आजार काेणत्याही वयाेगटात हाेऊ शकताे. वयस्कर, धूम्रपान करणाऱ्यांत ही समस्या अगदी सामान्य आहे. बीएमजे ओपेनमध्ये प्रकाशित प्रबंधातून हा दावा करण्यात आला आहे. ब्रिटनच्या बायाेबँक अध्ययनात ४ लाखांवर लाेकांच्या डेटाचे विश्लेषण करण्यात आले. ४० ते ६९ वयाेगटातील लाेकांना २००६ व २०१० दरम्यान झालेल्या अध्ययनात सहभागी करण्यात आले हाेते. सहभागी लाेकांकडून त्यांच्या झाेपण्याच्या सवयींबद्दलची माहिती संकलित करण्यात आली हाेती. ११ वर्षे चाललेल्या या अध्ययनात ग्लुकाेमाच्या ८ हजार ६९० प्रकरणे शाेधून काढण्यात आली. सामान्यपणे झाेप घेणाऱ्या लाेकांच्या तुलनेत नीट झाेप न घेणाऱ्या किंवा दिवसा घाेरणाऱ्यांत ग्लुकाेमाची जाेखीम ११ टक्के वाढते. अनिद्रा किंवा अपुरी झाेप घेणाऱ्यांत हा धाेका १३ टक्क्यांनी वाढताे. चांगली झाेप न झाल्यास निर्णय क्षमता, स्वभाव, नवीन शिकण्याची क्षमता, स्मरणशक्तीवरही वाईट परिणाम हाेताे. २०४० पर्यंत ११.२ काेटी लाेक ग्लुकाेमाने पीडित हाेऊ शकतात.

ऑप्टिक नर्व्हवर वाईट परिणाम ग्लुकाेमामुळे डाेळे ते मेंदू यांना जाेडणाऱ्या ऑप्टिक नर्व्हवर वाईट परिणाम हाेताे. दृष्टीशी संबंधित संवेदनशील पेशींची हानी हाेते. याेग्य वेळी उपचार न झाल्यास दृष्टी कायमची गमवावी लागू शकते.

बातम्या आणखी आहेत...