आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रेम करण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आठवड्याभराची सुट्टी देण्यात आल्याची गोष्ट तुम्ही कधी ऐकली किंवा वाचली आहे का? नाही.., तर मग वाचा! शेजारच्या चीनमध्ये असे घडले आहे. येथील सरकारने जन्मदर वाढवण्यासाठी हे अनोखे पाऊल उचलले आहे.
यासंबंधीच्या वृत्तानुसार, जगात सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या चीनचा जन्मदर चांगलाच कोसळला आहे. यामुळे तेथील सरकार आता जनतेला अधिकाधिक मुले जन्माला घालण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. यासाठी वेगवेगळे निर्णयही लागू करत आहे. याअंतर्गत आता अनेक महाविद्यालयांनीही काही अनोखी पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. यापैकी एक असणआऱ्या मियायांग फ्लाइंग व्होकेशनल कॉलेजने आपल्या विद्यार्थ्यांसाठी 'स्प्रिंग ब्रेक'ची घोषणा केली आहे.
विद्यार्थ्यांना वसंत ऋतू अनुभवण्याची, निसर्गाच्या जवळ जाण्याची व प्रेमात पडण्याची संधी मिळावी म्हणून चीनमधील महाविद्यालय हा 'स्प्रिंग ब्रेक' देत आहेत. त्यामुळे ग्लोबल मीडियाही चिनी कॉलेजच्या या उपक्रमाकडे विद्यार्थ्यांना 'प्रेम' करण्यासाठी देण्यात आलेली सुट्टी म्हणून पाहत आहेत. एनबीसी न्यूजच्या वृत्तानुसार, चीनच्या अनेक महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठी आठवड्याभराच्या 'स्प्रिंग ब्रेक'ची घोषणा करण्यात आली आहे. फॅन मेई एज्युकेशन ग्रुपच्यावतीने संचलित मियायांग फ्लाइंग व्होकेशनल कॉलेजने प्रथमच 21 मार्च रोजी अशा ब्रेक अर्थात सुट्ट्यांची घोषणा केली होती.
महाविद्यालयांत 'स्प्रिंग ब्रेक'ची घोषणा
'स्प्रिंग ब्रेक'च्या घोषणेनुसार, लियांग गुओहुई मियायांग फ्लाइंग व्होकेशनल कॉलेजचे डेप्युटी डीन म्हणाले की, या सुट्ट्यांत विद्यार्थ्यांना पाणी व हिरव्यागार डोंगर पाहता येतील. वसंत ऋतुचा आनंद घेता येईल. यातून केवळ विद्यार्थ्यांच्या भावनांचा विकास होणार नाही, तर शाळेत परतल्यानंतर त्यांची शैक्षणिक क्षमता समृद्ध व सखोलही होईल. या प्रकरणी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आपल्या प्रेमाचा शोध संपवण्याचीही खास सूचना केली आहे.
1 ते 7 एप्रिलपर्यंत सुट्टी
फॅन मेई एज्युकेशन ग्रुपच्या इतर महाविद्यालयांनीही 1 ते 7 एप्रिलपर्यंत स्प्रिंग ब्रेक अर्थात प्रेमाची सुट्टी दिली आहे. या माध्यमातून तेथील विद्यार्थ्यांना निसर्ग व जीवनावर प्रेम करण्यासह स्प्रिंग ब्रेकचा आनंद घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष बाब म्हणजे सुट्ट्याच्या काळात विद्यार्थ्यांना आलेले अनुभव व केलेल्या कामाचा आढावा सादर करण्याचे निर्देशही महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना दिलेत. यात जोडीदारासह सहलींवर जाणे किंवा सायटिंगचे व्हिडिओ तयार करण्याचाही समावेश आहे.
हा जन्मदर वाढवण्याचा प्रयत्न
वृत्तसंस्था रॉयटर्सने आपल्या वृत्तात म्हटले आहे की, चिनी सरकारच्या जन्मदर वाढवण्याच्या प्रयत्नांना प्रोत्साहन म्हणून चिनी महाविद्यालयांनी या सुट्ट्या घोषित केल्या आहेत. चिनी सरकारने यासंबंधी 20 हून अधिक विविध योजना सादर केल्या आहेत. त्या अंतर्गत आता महाविद्यालयांनीही 'स्प्रिंग ब्रेक' देण्यास सुरुवात केली आहे. या सुट्ट्यांच्या माध्यमातून विद्यार्थी आपल्या प्रेमाचा शोध घेतील असे मानले जात आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.