आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Lufthansa Flights Canceled Due To Pilots' Strike, Chaos 2 Flights From Delhi To Frankfurt And Munich

दिल्लीत 700 प्रवासी अडकले:लुफ्थान्सा एअरलाइन्सच्या वैमानिकांच्या संपामुळे अनेक उड्डाणे रद्द, गोंधळाचे वातावरण

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जर्मन विमान कंपनी लुफ्थान्सा एअरलाइनने वैमानिकांच्या एकदिवसीय संपामुळे जगभरातील ८०० उड्डाणे रद्द केली आहेत. त्यात दिल्लीहून फ्रँकफर्ट आणि म्युनिचला जाणाऱ्या दोन विमानांचाही समावेश हाेता. शुक्रवारी पहाटे उड्डाणे रद्द करण्यात आल्याने दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल ३ वर ७०० प्रवासी अडकले होते. या प्रवाशांनी आणि त्यांच्या नातेवाइकांनी विमानतळावर चांगलाच गोंधळ घातला. त्यानंतर त्यांच्यासाठी अल्पोपाहाराची व्यवस्था करण्यात आली. लुफ्थान्सा एअरलाइनची दिल्लीहून फ्रँकफर्टची दुपारी २.५० वाजता आणि म्युनिकची दुपारी 1:10 वाजताची विमाने रद्द करावी लागली.

पहिल्या विमानासाठी ३०० तर दुसऱ्यासाठी ४०० प्रवासी प्रतीक्षेत होते. लुफ्थान्साने गुरुवारी सांगितले की त्यांची जगभरातील ८०० उड्डाणे रद्द करण्यात येत आहेत. यामुळे जगभरातील १.३० लाख प्रवाशांवर परिणाम होणार आहे.लुफ्थान्साकडे ५ हजार वैमानिक आहेत. ५.५ टक्के वेतनवाढीची त्यांची मागणी आहे.

बातम्या आणखी आहेत...