आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालुफ्थान्साच्या एका फ्लाइटची एअर टर्ब्युलन्समुळे अमेरिकेतील वॉशिंग्टनमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली. ही घटना 1 मार्चची आहे. आता बातमी समोर आली आहे की, विमान कंपनीने प्रवाशांना फोटो क्लिक करण्यास आणि व्हिडिओ शूट करण्यास मनाई केली होती. ज्यांनी व्हिडीओ बनवले त्यांना ते काढून टाकण्यास सांगण्यात आले, मात्र काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.
लुफ्थांसा एअरलाइन्सचे फ्लाइट LH469 37,000 फूट उंचीवरून उड्डाण करत होते. तेवढ्या टर्ब्युलन्स झाले आणि विमान सुमारे 4000 फूट खाली कोसळले. एअर टर्ब्युलन्सची तीव्रता एवढी होती की 7 प्रवासी जखमी झाले. उतरल्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या या टर्ब्युलन्सचे कारण समोर आलेले नाही.
पाहा, फ्लाइटमध्ये झालेल्या टर्ब्युलन्सचे फोटोज...
टेक्सासहून फ्रँकफर्टला जात होती फ्लाइट
हे विमान टेक्सासच्या ऑस्टिन येथून फ्रँकफर्ट, जर्मनीला जात होते. टेनेसी राज्यातून जात असताना टर्ब्युलन्स झाले, म्हणजेच उड्डाणाच्या वेळी हवा अनियंत्रित होऊन फ्लाइटच्या विंग्जना धडकू लागली. त्यामुळे विमानही अनियंत्रित होऊ लागले आणि प्रवाशांना हादरे बसू लागले.
प्रवासी म्हणाला- आम्ही खाली जात होतो, भीती वाटत होती
रोलांडा श्मिट नावाच्या एका प्रवाशाने सांगितले- टर्ब्युलन्सनंतर विमान अनियंत्रितपणे वर-खाली जाऊ लागले. काही वेळाने ते खालीच जाऊ लागला. आम्ही खूप घाबरलो. काही समजू शकले नाही. आतमध्ये ठेवलेले सामान जसे अन्न, भांडी उडून पडू लागली. यादरम्यान मला खूप दुखापत झाली. तसेच इतर 6 जण जखमी झाले.
त्या म्हणाल्या- लोक फोटो काढू लागले आणि व्हिडिओ बनवू लागले. दरम्यान, क्रूने कोणीही व्हिडिओ बनवू नये असे जाहीर केले. त्यांनी फोटो-व्हिडिओ डिलीट करण्यास सांगितले. मात्र, दुसऱ्या घोषणेमध्ये त्यांनी हे सर्व आमच्या सुरक्षिततेसाठी आणि प्रवाशांच्या गोपनीयतेसाठी असल्याचे म्हटले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.