आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराखोटे बोलणेही एक आजार आहे. जगात असे काही लोक आहेत, जे अनपेक्षितरीत्या अनेकदा खोटे बोलतात. यामुळे अनेक जण अडचणीत आहेत आणि कित्येकांचे घटस्फोटही झाले आहेत. असेच एक प्रकरण अमेरिकेतील नाट्य कलाकार आणि निर्माता क्रिस्टोफर मसीमाइन यांचे आहे. त्यांना खोटे बोलण्याची सवय आहे. यामुळे त्यांना त्रास होतो. या कारणामुळे त्यांची नोकरी गेली आणि घटस्फोटाची वेळ आली. त्यांच्या खोटे बोलण्याची कक्षा खूप मोठी आहे. एकदा त्यांनी दावा केला होता की, त्यांनी एव्हरेस्ट शिखर सर केले होते. प्रत्यक्षात तेव्हा ते कंबोडियात बसले होते. व्हाइट हाऊसमध्ये पुरस्कार मिळाल्याचा दावाही त्यांनी केलेला आहे. विशेष म्हणजे ते आपल्या खोटे बोलण्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनाही खोटे बोलतात.३६ वर्षीय क्रिस्टोफर म्हणतात की, खोटे बोलणारे बनावट नसतात तर ते मानसिकदृष्टया आजारी होतात. क्रिस्टोफरना क्लस्टर बी पर्सनॅलिटी डिसऑर्डर आहे. या सिंड्रोममध्ये व्यक्ती दुसऱ्यांचे लक्ष आकर्षित करण्यासाठी खोटे बोलतो. त्यांची पत्नी मेगी म्हणाली, तिला कळत नाही की, क्रिस्टोफर कधी खोटे बोलत आहेत आणि कधी खरे. तिने अनेकदा घटस्फोट घेण्याचा विचार केला. क्रिस्टोफर लहानपणापासून खोटे बोलतात. एकादा त्यांनी गणिताचे खोटे गुण सांगितले होते.
अमेरिका : ५.३% लोक दिवसात १५ वेळा खोटे बोलतात मिशिगन विद्यापीठातील सर्व्हेनुसार, अमेरिकेतील ५.३% लोक दिवसात सरासरी १५ वेळा खोटे बोलतात. अनेक जण नेते किंवा दुकानदार असल्याने खोटे बोलतात. काही स्पष्ट कारणाशिवाय खोटे बोलतात. मात्र, थेरपीच्या मदतीने या लोकांची स्थिती सुधारू शकते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.