आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐतिहासिक पर्यटनस्थळ वाचवण्याचे प्रयत्न:आंदोलनाच्या धोक्यामुळे माचू पिच्चूचे पर्यटन बंद

लिमा9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दक्षिण अमेरिकी देश पेरू येथील जगप्रसिद्ध माचू पिच्चूमध्ये पर्यटकांवर बंदी घातली आहे. राष्ट्राध्यक्षांविरोधातील आंदोलनामुळे सुमारे ५०० वर्षे जुन्या या ऐतिहासिक स्मारकाचे नुकसान होऊ नये,यासाठी हा निर्णय घेतला आहे. ज्या पर्यटकांकडे २१ जानेवारीनंतरचे तिकीट आहे, त्यांना एका महिन्यानंतर पुन्हा येण्याचा पर्याय दिला आहे. आंदोलकांनी माचू पिच्चूच्या रेल्वेस्थानकाचे नुकसान केले आहे.

10 लाख पर्यटक दरवर्षी येथे येतात. आंदोलनामुळे ४०० हून अधिक पर्यटक अडकले आहेत. 50 पेक्षा जास्त लोक सरकारविरोधी आंदोलनात आतापर्यंत मारले गेले आहेत. अनेक लोक जखमी झाले.

बातम्या आणखी आहेत...