आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेजोसची आधीची पत्नी मॅकेंझीने केले दुसरे लग्न:मुलांच्या शाळेतील विज्ञान शिक्षकाला मॅकेंझीने निवडले आपला जीवनसाथी

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

ऑनलाइन मार्केटिंग कंपनी अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोसची माजी पत्नी आणि जगातील सर्वात महिलांपैकी एक मॅकेंझी स्कॉटने दुसरे लग्न केले आहे. आता तिने अमेरिकेतील सिएटलमध्ये राहणाऱ्या तिच्या मुलांची शाळा लेकसाइडचे विज्ञान शिक्षक डॅन जॅव्हेटसोबत लग्न केले आहे. अब्जाधीश बिल गेट्सही याच शाळेचे विद्यार्थी आहेत. लग्नाची घोषणा डॅन यांनी एका चॅरिटेबल वेबसाइट गिव्हिंग प्लेजच्या माध्यमातून केली. डॅनने सांगितले, सुदैवाने एका झटक्यात आनंद माझ्या झोळीत आला आहे. मी त्या महिलेसोबत दांपत्य सूत्रांत बांधला गेलाे आहे, जी सर्वात उदार आणि दयाळू लोकांमध्ये सामील आहे. मी तिच्यासोबत आता गरजूंची मोठ्या संपत्तीसह आर्थिकदृष्ट्या सेवा करण्यास वचनबद्ध आहे. पुन्हा लग्न करण्याबाबत मॅकेंझीने सांगितले, डेन एक सुंदर माणूस आहे आणि मी त्याच्याबाबतीत खूप उत्साही व आनंदी आहे. दुसरीकडे जेफ बेजोसनेही डॅनला शानदार व्यक्ती म्हटले आहे.

मॅकेंझी समाजसेविका म्हणून ओळखली जाते. जॅव्हेटलाही समाजकार्याची आवड आहे. दोघांना त्यांच्या मालमत्तेतील मोठा भाग दान करायचा आहे. मॅकेंझी जगातील सर्वात श्रीमंत महिलांपैकी एक असून तिच्याकडे एकूण ५३ अब्ज डॉलरपेक्षा (सुमारे ३.८६ लाख कोटी रुपये) जास्त संपत्ती आहे. दोन वर्षांपूर्वीच तिने बेजोससोबत घटस्फोट घेतला. गेल्या वर्षीच तिने ६ अब्ज डॉलर (सुमारे ४३८०० कोटी रुपये) दान केले होते. त्यातील एक चतुर्थांश भाग महिलांशी संबंधित संघटना, फूड बँक आणि कृष्णवर्णीयांच्या महाविद्यालयांना दिले.

बातम्या आणखी आहेत...