आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Mafia Strongholds In Italy Now Ukraine Refugee Camps; The Italian Government Is Making Arrangements For 60,000 Citizens From Ukraine |marathi News

युद्धाचे 100 दिवस:इटलीतील माफियांचे अड्डे आता युक्रेन स्थलांतरितांच्या छावण्या; 20 लाख पुन्हा मायदेशी परतले

इटलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

युद्धामुळे युक्रेन सोडून इटलीत डेरेदाखल झालेले नागरिक छावण्यांत राहू लागले आहेत. पूर्वी माफिया-गुन्हेगारांचे अड्डे असलेल्या इमारतीत ही छावणी आहे. युक्रेन सोडून इटलीत स्थलांतरित होण्यासाठी ६० नागरिकांनी परवानगी मागितली आहे. आणीबाणीच्या परिस्थितीला हाताळण्यासाठी व पीडितांच्या मदतीसाठी इटलीच्या सरकारने पुढाकार घेतला आहे. माफिया किंवा गुन्हेगारांच्या ताब्यातील जप्त इमारतींमध्ये सरकारने स्थलांतरितांना आश्रय दिला आहे.

याच वर्षी मार्चमध्ये सरकारने ही योजना जाहीर केली होती. गेल्या चाळीस वर्षांत इटली सरकारने माफियांकडून सुमारे ३६ हजार इमारती जप्त केल्या आहेत. २०२१ मध्ये संघटित गुन्हेगारांकडून १६ हजार कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली होती. त्यात आलिशान बंगले, अपार्टमेंट, अंडरग्राउंड गॅरेजपासून शेतजमिनीचाही समावेश आहे. या विशाल मालमत्तेत विविधता आहे. त्याचबरोबर त्याच्या व्यवस्थापनाचेही आव्हान आहे. ४८ टक्के मालमत्तांना खासगी सेवाभागी संस्थांना तसेच स्थानिक प्रशासनाला भाड्याने देण्यात आले आहे. परंतु निम्मी मालमत्ता अजूनही वापरात नाही. या इमारतींच्या देखभालीचा खर्च संपूर्णपणे स्थानिक प्रशासनावर सोपवण्यात आला आहे. युरोपीय रिसर्च इन्स्टिट्यूट ऑन को-ऑपरेटिव्ह अँड सोशल एंटरप्रायझेसच्या संशोधक कॅटरिना डी बेनेडिक्टिस म्हणाल्या, या इमारतींची देखभाल स्थानिक सरकारच्या आवाक्याबाहेर आहे.

या इमारती रिकाम्या ठेवणे मोठी चूक ठरेल. तसे झाल्यास गुन्हेगारांचे पुन्हा फावेल. कायद्याने या मालमत्तांचा वापर सामाजिक कार्यासाठी केला जावा. उदाहरणार्थ या इमारती संग्रहालय, सामाजिक उद्योगात रूपांतरित केल्या जाऊ शकतात. दिव्यांग तसेच कौटुंबिक हिंसाचाराने पीडित लोक अशा इमारतींमध्ये हॉटेल चालवू शकतात, असे तज्ज्ञांना वाटते.

युद्धाचे १०० दिवस ... देश सोडणारे २० लाख मायदेशी परतले
कीव्ह रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्यास १०० दिवस पूर्ण झाले. परंतु अजूनही युद्ध समाप्तीची चिन्हे दिसत नाहीत. २४ फेब्रुवारीपासून सुमारे ७० लाख नागरिकांनी देश सोडला. तेवढेच लोक विस्थापित झाले. स्थलांतरितांमध्ये दोन तृतीयांश मुले आहेत. सर्वाधिक ३७ लाख नागरिक पोलंडला गेले आहेत. मात्र युक्रेनच्या सैनिकांनी रशियावर पलटवार केल्यानंतर अनेक युक्रेनचे नागरिक मायदेशी परतू लागले आहेत. एका अंदाजानुसार २० लाख नागरिक परतले.

युक्रेनचा सिवेरोडेनेत्स्क शहरावर अंशत: ताबा
युक्रेनचे सैन्य सिवेरोडोनेत्सकमध्ये. युक्रेनच्या सैन्याला सिवेरोडेनेत्सक शहराच्या २० टक्के भागावर पुन्हा ताबा मिळवण्यात यश आले. रशियाचे नियंत्रण असलेल्या भागात खारकीव्ह, लुहान्स्क, दोनेत्स्क, मोरियुपोल, खेर्सनच्या मोठ्या भागाचा समावेश आहे.

रशियाचा पराभव अटळ, उभारणीत भारत मदत करेल : झेलेन्स्की
युक्रेनचे राष्ट्रपती व्लादिमीर झेलेन्स्की यांनी अलीकडे महात्मा गांधींच्या तत्त्वज्ञानाचे स्मरण केले. ते म्हणाले- ‘शक्ती शरीराच्या हाडांमध्ये नव्हे तर निर्भयतेत वास करते.’ एका हवाल्यानुसार युक्रेनचे अधिकारी म्हणाले, युद्धानंतर युक्रेनच्या नव्या उभारणीच्या कार्यात भारत युक्रेनला साथ देईल.

बातम्या आणखी आहेत...