आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील सर्वात मोठा मोझॅक:44 शहरांमधील नैसर्गिक मार्बलपासून भव्य मोझॅक

अंकारा12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुर्कस्तानच्या दक्षिणेकडील प्रांत हातेमध्ये जगातील सर्वात मोठा मोझॅक तयार करण्यात आला आहे. त्याची अलीकडेच गिनीज बुकमध्ये नोंद झाली. १७ हजार २२२ चौरस फुटांच्या मोझॅकच्या उभारणीत ४४ शहरांतून आणलेल्या नैसर्गिक मार्बलचा वापर करण्यात आला.

३०० कामगारांनी मिळून सात महिन्यांत हे काम पूर्ण केले होते. मोझॅकमध्ये हाते प्रांतातील हजारो वर्षांच्या इतिहासाचे दर्शन घडते. त्यात शहरातील प्रमुख घटना, वारसा, संस्कृतीचा समावेश आहे. मुस्तफा कमाल विद्यापीठाच्या देखरेखीत पालिकेकडे याच्या दुरुस्तीचे काम केले जात आहे. पर्यटकांची येथे गर्दी होत आहे.

बातम्या आणखी आहेत...