आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Magnitude 5.6 Earthquake Hits Indonesia's Capital Jakarta, 20 Dead, More Than 300 Injured, People Left Their Homes In Fear

इंडोनेशिया भूकंप, 46 जण ठार:700 हून अधिक जखमी; घाबरून लोकांनी रिकाम्या केल्या इमारती

जकार्ता7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंडोनेशियामध्ये सोमवारी झालेल्या भूकंपात 46 जणांचा मृत्यू झाला. तर 700 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. राजधानी जकार्तासह आसपासच्या परिसरात लोक घाबरून बाहेर आले. इमारती रिकाम्या करण्यात आल्या आहेत.

वृत्तसंस्थेनुसार, भूकंपाची तीव्रता 5.6 इतकी होती आणि त्याचा केंद्रबिंदू जावाच्या सियांजूरमध्ये होते. एकाच रुग्णालयात 20 जणांचा मृत्यू झाल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

आफ्टरशॉकच्या भीतीने इमारती रिकाम्या

लोक भूकंपाचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत. यामध्ये तुटलेल्या इमारती, मोडतोड आणि खराब झालेल्या गाड्या दिसत आहेत. इमारतीजवळील एका अधिकाऱ्याने इंडोनेशियातील मेट्रो टीव्ही या वृत्तवाहिनीला सांगितले की, "आम्ही सध्या एवढेच सांगू शकतो की आम्ही एक महिला आणि एका मुलाची सुटका केली आहे. एकाचा मृत्यू झाला. आफ्टरशॉक्स येण्याची शक्यता असल्याने आम्ही लोकांना सध्या त्यांच्या इमारतींपासून दूर राहण्याचे आवाहन करत आहोत.

भूकंपानंतरची छायाचित्रे...

जगात दरवर्षी 20,000 भूकंप

जगात दरवर्षी अनेक भूकंप होतात, पण त्यांची तीव्रता कमी असते. राष्ट्रीय भूकंप माहिती केंद्र दरवर्षी सुमारे 20,000 भूकंपांची नोंद करते, त्यापैकी सुमारे 100 भूकंपांमुळे नुकसान होते. भूकंप काही सेकंद किंवा काही मिनिटे टिकतात, परंतु इतिहासातील सर्वात जास्त काळ टिकणारा भूकंप 2004 मध्ये हिंदी महासागरात झाला. हा भूकंप 10 मिनिटे चालला होता.

बातम्या आणखी आहेत...