आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS मध्ये पाहा श्रीलंकेची परिस्थिती:रस्त्यांवर सैन्य आणि आंदोलक भिडले, संचारबंदी फसली; मंत्र्यांची निवासस्थानेही जाळली

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीलंकेतील अत्यंत बिकट आर्थिक परिस्थितीमुळे निर्माण झालेले संकट आता आणखी एका गृहयुद्धाकडे वाटचाल करत आहे. पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी सोमवारी राजीनामा दिला. त्यानंतर जे घडले त्याची कोणी कल्पनाही करू शकत नाही. राजपक्षे कुटुंबीयांचे समर्थक आणि विरोधकांमध्ये रस्त्यावर रक्तरंजित संघर्ष सुरू झाला. पोलिसांनी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे आणि त्यांच्या कुटुंबाला पाठिंबा दिला.

त्यानंतर परिस्थिती चिघळली. सैन्याला बोलवावे लागले. सर्वसामान्यांनी सत्ताधारी पक्षाच्या खासदार, मंत्र्यांसह अन्य नेत्यांवर हल्ले करण्यास सुरुवात केली. गर्दीतून सुटण्यासाठी एका खासदाराने आत्महत्या केल्याचा आरोप आहे. दोन मंत्र्यांची घरे जाळण्यात आली. श्रीलंकेतील परिस्थिती दर्शवणारे काही महत्त्वाचे फोटो येथे पाहा

सोमवारी माजी पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांचे समर्थक आणि आंदोलकांमध्ये संघर्षही झाला. यानंतर आंदोलकांनी महिंदा राजपक्षे यांच्या घराबाहेरील वाहनांची जाळपोळ केली.

आंदोलकांनी श्रीलंका सरकारचे मंत्री सानथ निशंथा यांचे घरही जाळले. हिंसाचार आणि जाळपोळीच्या घटनांनंतर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

महिंदा राजपक्षे यांनी राजीनामा दिल्यानंतर कोलंबोमध्ये हिंसक निदर्शने सुरू झाली. कोलंबोमध्ये संघर्षानंतर आंदोलकांनी बस पेटवून दिली.

कोलंबोमध्ये सर्वसामान्यांसह वकिलांनी मानवी साखळी करून सरकारविरोधात निदर्शने केली. अशीच निदर्शने देशाच्या अनेक भागात झाली.

राजपक्षे कुटुंबातील एका सहकाऱ्याची ही कार आहे. या गाडीतून दारू नेली जात होती. लोकांनी ती रस्त्यात अडवून गाडीची तोडफोड केली.

हा फोटो माजी राष्ट्रपती महिंदा राजपक्षे यांच्या घराबाहेरचे आहे. महिंदा समर्थक आणि विरोधकांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. अनेक लोक जखमी झाले.

महिंदा राजपक्षे यांच्या घराबाहेर परिस्थिती खूपच वाईट होती. मात्र, ते घरी उपस्थित नव्हते. याठिकाणी पोलिसांचा ताफा असतानाही समर्थक आणि विरोधकांमध्ये हाणामारी झाली.

कोलंबोमध्ये ट्रेड फेयरसुरू होते. सोमवारी संतप्त लोकांनी येथे पोहोचून तोडफोड केली. याठिकाणी उपस्थित असलेले लोक जीव मुठीत घेऊन बचावले.

कोलंबो आणि देशातील इतर महत्त्वाच्या शहरांमध्ये लष्कर तैनात करण्यात आले आहे. दोन दिवसांपासून कर्फ्यू लागू आहे, पण सरकार आणि सुरक्षा दलांना त्याचे पालन करता आलेले नाही.

हा फोटो श्रीलंकेच्या पत्रकार मारियाना डेव्हिडने शेअर केला आहे. महिंदाच्या काळात श्रीलंका प्रत्येक स्तरावर केवळ विनाशाकडेच गेली असल्याचे डेव्हिडचे म्हणणे आहे.

श्रीलंकन पत्रकार मधुभाषिनी रत्नायके यांनी हा फोटो शेअर केला आहे. रत्नायके यांच्या म्हणण्यानुसार, श्रीलंका सरकार शांततापूर्ण निदर्शनांना बळाच्या जोरावर दडपून टाकत आहे.

अशी स्थिती सोमवारी कोलंबोच्या रस्त्यांवर पाहायला मिळाली. विशेष म्हणजे पोलिस-लष्कर फक्त व्हीव्हीआयपी भागातच तैनात करण्यात आले होते.

या मुलीची आणि तिच्या कुत्र्याची सुरक्षा दलांनी हिंसाचारग्रस्त भागातून सुटका केली. त्यांना कोलंबोच्या बाहेरील भागात बांधलेल्या निर्वासितांच्या छावणीत ठेवण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...