आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इस्लामाबाद:मलालास मायदेशातच तीव्र विरोध; इस्लामविरोधी विचार मांडल्याचा शाळा संघाचा दावा, आगपाखड

इस्लामाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मलाला युसूफझाईने १७ व्या वर्षापासून कट्टरवादाच्या विरोधात लढाई सुरू केली. मुले-तरुणांच्या दमनाच्या विरोधात आवाज उठवला. मुलांच्या शिक्षणासाठी संघर्ष केला आणि त्यांना हक्क मिळवा म्हणून मोहिम हाती घेतली. या कामाबद्दल २०१४ मध्ये मलालास प्रतिष्ठेचे नोबेल शांती पुरस्कारानेही गौरवले गेले होते. परंतु पाकिस्तानातील या कार्यकर्तीच्या विरोधात मायदेशातीलीच खासगी शाळा उभ्या राहिल्या आहेत. खासगी शाळांच्या संघटनेने अँटी मलाला माहितीपट जारी केला आहे. त्यात मलालाने लिव्ह इन रिलेशनशिपचे समर्थन केल्याचा दावा आहे. ही बाब इस्लामच्या विरोधात आहे. शाळा संघटनेचे अध्यक्ष काशिफ मिर्झा म्हणाले, देशातील २ लाख खासगी शाळांनी मलालाचे वास्तव जाहीर केले आहे.

आरोप: मलालाच्या पुस्तकात वादग्रस्त गोष्टी
काशिफ िमर्झा म्हणाले, मलालाचे पुस्तक ‘आय अॅम मलाला’ मध्ये अनेक वादग्रस्त गोष्टी आहेत. त्या इस्लामविरोधी आहेत. पाकिस्तानचे संस्थापक मोहंमद अली जिन्ना व पाकिस्तान सैन्याच्या विरोधात आहेत. हे पुस्तक पश्चिमेकडील देशांच्या इशाऱ्यावर लिहिण्यात आले आहे. मलालाच्या माध्यमातून आपले उद्देश पूर्ण करण्याचे त्यांचे मनसुबे आहेत. मलालाच्या पुस्तकातून पाक सैन्याचा उल्लेख ‘दहशतवादी’ असा आहे. त्यामुळे पुस्तकावर बंदी घालण्यात यावी.

बातम्या आणखी आहेत...