आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Malavi's Initiative For Environmental Protection In Indonesia; Arboriculture Is Now Mandatory For Graduation! | Marathi News

ग्लाेबल वाॅर्मिंग:इंडाेनेशियामध्ये पर्यावरण संरक्षणासाठी माैलवींचा  पुढाकार; आता पदवीसाठी वृक्षाराेपण अनिवार्य!

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जगातील सर्वाधिक लाेकसंख्या असलेले मुस्लिम राष्ट्र इंडाेनेशियातील माैलवी पर्यावरणाचे प्रचारक झाले आहेत. त्यांनी पर्यावरण संरक्षणाची माेहीम सुरू केली आहे. प्रेषित कशा प्रकारे झाडांचे संवर्धन करत आणि त्यासाठी सातत्याने कसे प्रयत्न करायचे याची माहिती माैलवी सामान्य नागरिकांना देत आहेत. त्याद्वारे जनजागृती केली जात आहे. पर्यावरण संवर्धनाच्या या अभियानाला इकाे-इस्लाम असे नाव देण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर पर्यावरण बचावासाठी फतवेदेखील काढले जात आहेत. इंडाेनेशियातील मशिदींद्वारे चालवण्यात येणाऱ्या शाळांमध्ये किमान ४० लाख मुले शिक्षण घेतात. त्यांना पर्यावरण संरक्षणासाठी याेग्य ते प्रशिक्षण दिले जात आहे.

पदवीधर हाेण्यासाठी वृक्ष लागवडीची अट घालण्यात आली आहे. वृक्षाराेपण केले नाही तर पदवी मिळणार नाही, असा नियम करण्यात आला आहे. जगभरातील वाढत्या प्रदूषणामुळे तापमानातही वाढ हाेत आहे. त्यातून सागरी पातळी वाढली आहे. ग्लाेबल वाॅर्मिंग व पुरामुळे इंडाेनेशियाच्या अस्तित्वावर संकट आेढवले आहे. दरवर्षी समुद्र १० इंच जमीन गिळंकृत करत आहे.जकार्तामधून वाहणाऱ्या १३ नद्यांतील पूरस्थिती दिवसेंदिवस वाईट बनली आहे. २०२० मधील पुरात हजाराे लाेकांना प्राण गमावावे लागले हाेते. वर्ल्ड बँकेनुसार या दशकाच्या अखेरीस ४२ लाख नागरिकांवर पलायन करण्याची वेळ येऊ शकते.

एक हजार मशिदींवर साेलार पॅनल
इंडाेनेशियातील एक हजार मशिदींवर साेलार पॅनल लावण्यात आले आहेत. माैलवी स्वत:देखील स्मार्ट एनर्जी मीटर लावू लागले आहेत. कचऱ्याचे पुनर्वापर प्रकल्पही राबवले जात आहेत. अपारंपरिक ऊर्जेसाठी २४ हजार काेटी रुपयांच्या निधीचीही तरतूद केली आहे.

बातम्या आणखी आहेत...