आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंट्री ऑफ द इयर:2020 च्या सर्वश्रेष्ठ देशांत मलावी अव्वल, महामारीनंतरही लोकशाही अबाधित राहिलेल्या देशांचा यादीत समावेश

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महामारीचा सामना करणाऱ्या अनेक देशांनी विविध प्रकारे विकासाची वाट धरली आहे. २०२० मध्ये आलेल्या कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक अस्थिरतेकडे अनेक देशांनी संकट म्हणून बघितले. मात्र काही देश असेही होेते, ज्यांनी महामारीचा सक्षमपणे सामना करण्यासह देशातील लोकशाहीही अबाधित ठेवली. ‘द इकॉनॉमिस्ट’ने २०२० मध्ये अशाच काही देशांमधून आफ्रिकी देश मलावीची ‘कंट्री ऑफ द इयर’ म्हणून निवड केली आहे. दरम्यान, भारताचा या यादीत समावेश नाही. मात्र इतर देशांचा समावेश आहे.

महामारीपूर्वी मोठ्या प्रमाणात अस्थिरता होती. २०१२ मध्ये येथे राष्ट्राध्यक्षांचा मृत्यू झाला. मात्र हे गुपित ठेवण्यात आले. त्यांचे भाऊ पीटर मुथारिका यांना सत्ता स्थापनेसाठी वेळ मिळावा यासाठी खटाटोप करण्यात आला. त्यांना यात अपयश आले. मात्र, २ वर्षांनंतर पुन्हा निवडले गेले. या निवडणुकीत गैरप्रकार झाला म्हणून देशात आंदोलनांना सुरुवात झाली. जूनमधील निवडणुकीत जनतेने मुथारिकांना नाकारत लाझरस चकव्हेरा यांना सत्ता दिली. मलावीतील जनता खऱ्या अर्थाने ‘नागरिक’ आहेत. लोकशाहीला पुनरुज्जीवित केल्यामुळेच या देशाची ‘कंट्री ऑफ द इयर’ म्हणून निवड करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...