आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनाचे भयंकर रुप:भारतातून मलेशियात गेलेल्या व्यक्तीमध्ये सापडला कोरोनाचा भयंकर स्ट्रेन D614G, याच्या संक्रमणाचा वेग सध्याच्या व्हायरसपेक्षा 10 पट जास्त

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मलेशियामध्ये कोरोना व्हायरसचे असे रुप (स्ट्रेन) सापडले आहे, जे सध्याच्या व्हायरसपेक्षा 10 पट भयंकर आहे. या स्ट्रेनचेला 'D614G' नाव देण्यात आले आहे. हा स्ट्रेन पहिल्यांदा जुलै 2020 मध्ये सापडला. कोरोनाचा हा स्ट्रेन 45 जणांच्या संक्रमित समुहामधील तिघांमध्ये आढळला. व्हायरसचा हा स्ट्रेन भारतातून परतलेल्या एका रेस्तरॉच्या मालकाद्वारे पसरला आहे, जो प्रवासानंतर 14 दिवस होम क्वारंटाइन राहिला नाही. या व्यक्तीला आता पाच महिन्यांचा तुरुंगवास आणि दंड लावण्यात आला आहे.

कोरोनाचे नवीन स्ट्रेन व्हॅक्सीन तयार करण्यात अडसर आणत आहेत

मलेशियामधील डायरेक्टर-जनरल हेल्थ नूर हिशाम अब्दुल्ला यांनी सांगितले की, कोरोनाचे येणारे नवीन स्ट्रेन महत्वाचे आहेत. कोरोना आपले रुप बदलत आहे, याचा काही परिणाम व्हॅक्सीनच्या क्षमतेवरही पडेल.

कोरोनाचे सर्वात जास्त स्ट्रेन अमेरिका आणि यूरोपमध्ये दिसले

जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणने आहे की, कोरोनाचे सर्वात जास्त स्ट्रेन अमेरिका आणि यूरोपमध्ये दिसले आहेत. पण, येथील स्ट्रेन धोकादायक ठरणार नाहीत. सेल प्रेस जर्नलमध्ये प्रकाशित शोधानुसार, कोरोनाच्या या स्ट्रेनच्या व्हॅक्सीनच्या क्षमतेवर जास्त परिणाम पडण्याची शक्यता कमी आहे.

म्यूटेशनमुळे वाढत आहे चेन तोडण्याची गरज

डायरेक्टर-जनरल हेल्थ नूर हिशाम अब्दुल्ला यांनी सांगितल्यानुसार, कोरोनाचा हा स्ट्रेन मलेशियात आढळला आहे. त्यामुळे येथील नागरिकांना आता सावध राहण्याची गरज आहे.

बातम्या आणखी आहेत...