आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामलेशियाची राजधानी कुआलालांपुर सेलांगर भागात भूस्खलन झाले. यामध्ये आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. अग्निशमन आणि बचाव विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ढिगाऱ्यातून 23 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. शोध आणि बचाव कार्य सुरू आहे.
एपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये एक 5 वर्षीय मुलाचा आणि एका महिलेचा समावेश आहे. अन्य सात जणांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी सुमारे 400 पोलिस तैनात करण्यात आले आहेत. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा अजून वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पिकनिक स्पॉटवर अपघात
पिकनिक स्पॉट असलेल्या ठिकाणी हा अपघात झाला आहे. येथे एक फार्म हाऊस होते, ज्यामध्ये 79 लोक होते. अधिकाऱ्याने सांगितले की, फार्म हाऊसजवळ 30 मीटर उंचीवरून खडक रस्त्यावर पडले आणि 1.2 हेक्टर परिसरात पसरले.
कोलंबियात भूस्खलन, 8 मुलांसह 34 ठार
दक्षिण अमेरिकन देश कोलंबियामध्ये सोमवारी एक मोठी दुर्घटना घडली. रिसारल्डा प्रांतात येथे एक बस भूस्खलनाखाली आली. या अपघातात 34 जणांचा मृत्यू झाला. नॅशनल युनिट फॉर डिझास्टर रिस्क मॅनेजमेंट (UNGRD) नुसार, मृतांमध्ये आठ बालकांचा समावेश आहे. अजूनही अनेक लोक ढिगाऱ्याखाली दबले गेले असून बचावकार्य सुरू आहे.
रिसारल्डा प्रांतात मुसळधार पावसानंतर भूस्खलन झाल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. बससोबतच इतर काही वाहनेही ढिगाऱ्याखाली गाडली गेली. ही बस कॅली शहरातून चोको प्रांतातील कोंडोटो शहराकडे जात होती. पुएब्लो रिको आणि सांता सेसिलिया दरम्यान अपघात झाला. संपुर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
नेपाळमध्ये भूस्खलनामुळे 17 जण ठार
नेपाळमध्ये भूस्खलनाने कहर केला आहे. भूस्खलनामुळे 17 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण बेपत्ता आहेत. त्यामुळे मृतांचा आकडाही वाढू शकतो. संततधार पावसामुळे भूस्खलन झाले आहे. नेपाळमधील अछाम जिल्ह्यात भूस्खलनामुळे 17 जणांचा मृत्यू झाला असून पाच जणांचा शोध लागलेला नाही. एका स्थानिक अधिकाऱ्याने ही माहिती दिली. संपुर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
व्हेनेझुएलामधील पुराचा कहर
दक्षिण अमेरिकन देश व्हेनेझुएलामध्ये पूर आणि मुसळधार पावसामुळे परिस्थिती बिकट झाली आहे. रविवारी झालेल्या भूस्खलनात 22 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 50 लोक बेपत्ता झाले आहेत. याचा 3 राज्यांतील लोकांना खूप त्रासाला सामोरे जावे लागत आहे. राजधानीजवळील लास तेजेरियास शहरात सर्वाधिक नुकसान झाले आहे. राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांनी तीन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. संपुर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.